राहुल गांधींविरोधात वायनाड मध्ये प्रचंड संताप; कम्युनिस्ट पार्टीच्या उमेदवार एनी राजा यांचा दावा


वृत्तसंस्था

वायनाड : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात वायनाड लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचंड संताप आहे. कारण त्यांनी वायनाडच्या लोकांचा विश्वासघात केला आहे, असा घणाघाती आरोप कम्युनिस्ट पार्टीच्या उमेदवार एनी राजा यांनी केला. On Congress leader Rahul Gandhi, CPI candidate from Wayanad Lok Sabha Seat Annie Raja

भारतीय कम्युनिस्ट पार्टी काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीत सामील असली, तरी प्रत्यक्षात केरळमध्ये काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी प्रणित लेफ्टीस्ट डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात मोठी टक्कर आहे. त्यामुळेच कम्युनिस्ट पार्टीने पक्षाचे सरचिटणीस ए. राजा यांच्या पत्नी एनी राजा यांना वायनाड मधून राहुल गांधींच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. त्या पायाला भिंगरी लावून वायनाड मध्ये प्रचार करत आहेत.

राहुल गांधी राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत, पण वायनाडचे लोकप्रतिनिधी म्हणजेच खासदार म्हणून त्यांचा परफॉर्मन्स चांगला नाही. वायनाड मधले कुठलेच प्रश्न त्यांनी लोकसभेत मांडून सोडवून घेतले नाहीत. त्यामुळे वायनाडच्या मतदारांमध्ये त्यांच्या विरोधात मोठा असंतोष आहे. वायनाड मध्ये रेल्वे लाईनचा मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर वन्यजीवांशी संबंधित मोठे प्रश्न आहे. परंतु, त्या प्रश्नांची तड राहुल गांधींनी लावली नाही. त्यामुळे वायनाड मधले लोक राहुल गांधींवर नाराज आहेत, असे परखड निरीक्षण एनी राजा यांनी नोंदविले.

इथल्या लोकांना केवळ राष्ट्रीय पातळीवरचा नेता नको आहे, तर वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवणारा खासदार हवा आहे आणि रेल्वे लाईन किंवा बाकीचे प्रश्न केरळच्या विधानसभेत मांडून उपयोग नाही, तर ते लोकसभेत मांडले पाहिजेत म्हणून आपणच वायनाडच्या उत्तम लोकप्रतिनिधी अर्थात खासदार होऊ शकते, असे वक्तव्य एनी राजा यांनी केले.

एनी राजा यांनी थेट राहुल गांधींवर शरसंधान साधल्यामुळे “इंडिया” आघाडीत काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी यांच्यात वादाची ठिणगी पडून ती अधिकच भडकली आहे.

On Congress leader Rahul Gandhi, CPI candidate from Wayanad Lok Sabha Seat Annie Raja

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात