आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्यावर विजयवाडा येथे हल्ला; रोड-शो दरम्यान दगडफेक; कपाळाला मार

वृत्तसंस्था

विजयवाडा : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि YSR काँग्रेस पक्षाचे (YSRCP) अध्यक्ष YS जगन मोहन रेड्डी यांच्यावर शनिवारी रात्री निवडणूक प्रचारादरम्यान दगडफेक करण्यात आली. यात जगन मोहन जखमी झाले आहेत. त्याच्या कपाळावर जखम झाली. Andhra Pradesh Chief Minister Jagan Reddy attacked in Vijayawada; stone pelting during road-shows; Hit the forehead

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, जगन मोहन यांनी विजयवाडामध्ये मेमंथा सिद्धम (आम्ही सर्व तयार आहोत) बस मार्च काढला होता. ते बसवरून उभे राहून लोकांना अभिवादन करत होते. यावेळी त्याच्यावर लोरांनी फुलांसह दगडफेक केली यात ते जखमी झाले.

पक्षाने टीडीपीवर हल्ल्याचा आरोप केला आहे

वायएसआरसीपीने सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्र्यांवर दगडफेक केली, ज्यामुळे त्यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली. मुख्यमंत्र्यांना प्राथमिक उपचारासाठी बसमध्ये नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सीएम रेड्डी यांनी त्यांचा बस प्रवास पुन्हा सुरू केला. मुख्यमंत्र्यांवर झालेल्या हल्ल्यासाठी पक्षाने तेलुगू देसम पक्षाला (टीडीपी) जबाबदार धरले आहे. पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले सीएम रेड्डी यांच्या दौऱ्याची लोकप्रियता टीडीपीच्या लोकांना सहन करता आली नाही. याचे उत्तर 13 मे रोजी राज्यातील जनता देईल.

Andhra Pradesh Chief Minister Jagan Reddy attacked in Vijayawada; stone pelting during road-shows; Hit the forehead

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात