जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे आवाहन केले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये भयानक युद्धाची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्राकडून एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या गंभीर परिस्थितीचा तीव्र निषेध केला आणि इशारा दिला की या जगाला दुसरे युद्ध परवडणारे नाही.Major UN statement on possibility of deadly war between Israel and Iran says The world now
याशिवाय संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी पश्चिम आशियातील अनेक आघाड्यांवर मोठ्या लष्करी संघर्षाला कारणीभूत ठरू शकतील अशा कोणत्याही कृती टाळण्यासाठी जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे आवाहन केले.
“इराणने इस्रायलवर मोठ्या प्रमाणात केलेल्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या गंभीर वाढीचा मी तीव्र निषेध करतो,” असे गुटेरेस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच, मी शत्रुत्वाचा तत्काळ अंत करण्याचे आवाहन करतो. संपूर्ण प्रदेशात पसरलेल्या तणावाबद्दल आणि त्यातून निर्माण होणारा खरा धोका याबद्दल त्यांना खूप चिंता वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. मी वारंवार जोर दिला आहे की या जगाला दुसरे युद्ध परवडणारे नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.
13 एप्रिलच्या रात्री उशिरा इराणने इस्रायली लष्करी लक्ष्यांवर लष्करी हल्ले केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रातील इराणच्या स्थायी मिशनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला पत्राद्वारे दिली आहे. इराणी मिशनने म्हटले आहे की इराणने इस्त्रायली लष्करी आक्रमणाला प्रतिसाद म्हणून यूएन चार्टरच्या अनुच्छेद 51 अंतर्गत स्व-संरक्षणाच्या अधिकारानुसार कारवाई केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App