प्रसाद वाटप करणाऱ्या गणेश मंडळांना एफडीए नोंदणी बंधनकारक

FDA registration

विशेष प्रतिनिधी

पुणे : आगामी गणेशोत्सवात भाविकांना अन्नदान, महाप्रसाद किंवा प्रसादाचे वाटप करणाऱ्या गणेश मंडळांना यंदा अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. उत्सवाच्या दहा दिवसांत अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी प्रशासनाने ही उपाययोजना केली आहे.

FDA कडून काही दिवसांपूर्वी गणेश मंडळांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. भाविकांना वितरित करण्यात येणारे अन्न व प्रसाद स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार असावा, यावर या नियमावलीत विशेष भर देण्यात आला आहे.



मात्र, नोंदणी नेमकी कोणत्या मंडळांनी करायची, ती कशी करायची आणि त्यासाठी कोणते निकष लागू असतील, याबाबत अनेक गणेश मंडळांमध्ये संभ्रम असल्याचे समोर आले आहे.

उत्सव काळात नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी FDA च्या पुणे विभागाने विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेट देऊन महाप्रसाद व अन्नवाटपाच्या गुणवत्तेची पाहणी करणार आहेत. तसेच अन्न तयार करणे, साठवणूक करणे आणि वाटप करण्याच्या प्रक्रियेत स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याचीही तपासणी केली जाणार आहे.

FDA चे सहआयुक्त दिगंबर भोगावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्नवाटप करणाऱ्या गणेश मंडळांना १२ महिने, तीन महिने किंवा केवळ गणेशोत्सवाच्या १० दिवसांसाठी नोंदणी करता येणार आहे. तीन महिन्यांच्या तसेच १० दिवसांच्या अल्पकालीन नोंदणीसाठी ₹१०० शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

मंडळांनी FSSAIच्या FoSCoS ऑनलाइन पोर्टलवर आवश्यक माहिती भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गणेशोत्सवात हजारो भाविकांना प्रसाद आणि भोजनाचे वाटप केले जाते. या काळात दूषित अन्न, अन्नातून होणारे संसर्ग तसेच अस्वच्छतेमुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत असल्याचे FDAने स्पष्ट केले आहे.

FDA registration mandatory for Ganesh Mandals distributing Prasad

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात