सण-उत्सवातील भंडाऱ्यांवर FDA ची करडी नजर; महाप्रसादासाठी नवे नियम लागू

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि यात्रांच्या काळात आयोजित करण्यात येणाऱ्या भंडारा, महाप्रसाद, अन्नछत्र, लंगर तसेच सामूहिक अन्नवाटप कार्यक्रमांमध्ये अन्नाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अन्नपदार्थांमधील भेसळ आणि असुरक्षित अन्नामुळे होणाऱ्या घटना रोखण्यासाठी राज्यभर या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. Mahaprasad

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘सण उत्सव अन्न सुरक्षा अंमलबजावणी स्थायी आदेश 2026’ जारी केला आहे. सर्व धर्मांच्या सण-उत्सवांना हे नियम लागू राहणार आहेत. भाविकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्न मिळावे, तसेच अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखता यावी, हा या आदेशामागील उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

काय आहेत FDA चे नवे नियम? 

परवानाधारक किंवा नोंदणीकृत केटरर अथवा स्वयंपाकगृहामार्फत महाप्रसाद किंवा सामूहिक अन्नवाटपासाठी अन्न तयार केले जाणार असल्यास, संबंधित आयोजकांना कार्यक्रमाच्या किमान सात दिवस आधी पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे विहित नमुन्यात पूर्वसूचना सादर करावी लागणार आहे.

कार्यक्रमादरम्यान अन्न व्यवसाय चालकांनी स्वच्छतेचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल. त्यामध्ये स्वच्छ पाण्याचा वापर, अन्नाचे योग्य तापमान नियंत्रण, कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे ठेवणे, अन्न हाताळणाऱ्या व्यक्तींची वैयक्तिक स्वच्छता आणि अन्नाची सुरक्षित साठवणूक यांचा समावेश आहे.



FDA कडे प्राप्त होणाऱ्या पूर्वसूचनांच्या आधारे संबंधित कार्यक्रमांची जोखीमाधारित तपासणी केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार अन्नाचे नमुनेही घेण्यात येतील. नियमांचे उल्लंघन किंवा अन्न सुरक्षेशी संबंधित त्रुटी आढळल्यास परिस्थितीनुसार तात्काळ अंमलबजावणीची कारवाई केली जाणार आहे.

त्यामुळे महाप्रसाद, भंडारा, लंगर किंवा अन्य सामूहिक अन्नवाटप कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांनी तसेच संबंधित अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा नियमांचे पालन करावे आणि प्रशासनाला आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन FDA कडून करण्यात आले आहे.

सणांचे तीन स्तरांत वर्गीकरण

सण-उत्सवांच्या काळात अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी FDA ने वर्षभराचे अन्न सुरक्षा कॅलेंडर तयार केले आहे. त्यानुसार विविध सण आणि धार्मिक कार्यक्रमांचे तीन स्तरांत वर्गीकरण करण्यात आले आहे.

प्रथम श्रेणी – राज्यव्यापी सण :
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ (ख्रिसमस) आणि नववर्ष पूर्वसंध्या.

द्वितीय श्रेणी – प्रादेशिक सण :
मकर संक्रांती, महाशिवरात्र, होळी, गुढीपाडवा, आषाढी व कार्तिक वारी, श्रावण मास, जन्माष्टमी, दहीहंडी, कोजागिरी आणि गुरुनानक जयंती.

तृतीय श्रेणी – स्थानिक कार्यक्रम :
स्थानिक जत्रा, पालखी सोहळे आणि उरूस यांचा या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.

या वर्गीकरणाच्या आधारे सण-उत्सवांच्या काळात अन्न सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या तपासण्या, नमुना संकलन आणि कारवाईला प्राधान्य दिले जाणार आहे.

FDA keeps a close watch on community feasts during festivals; new rules enforced for Mahaprasad.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात