Jabalpur : एमपीच्या जबलपूरमध्ये क्रूझ बुडाले, 6 मृतदेह सापडले; 15 हून अधिक बेपत्ता, 19 जणांना वाचवले

Jabalpur

वृत्तसंस्था

जबलपूर : Jabalpur मध्य प्रदेशातील जबलपूर येथील नर्मदा नदीवरील बरगी धरणात गुरुवारी संध्याकाळी पर्यटकांना घेऊन जाणारे एक क्रूझ जहाज उलटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. १९ जणांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. १५ हून अधिक जण अद्याप बेपत्ता आहेत.Jabalpur

बरगी शहराचे पोलिस अधीक्षक (CSP) अंजुल मिश्रा यांनी सांगितले की, एमपी टुरिझमच्या क्रूझमध्ये ४० ते ४५ जण होते. अचानक आलेल्या वादळामुळे हा अपघात झाला.Jabalpur



अपघाताची माहिती मिळताच, एसडीआरएफचे पथक बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. अंधारामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. मात्र, मोठ्या टॉर्चच्या साहाय्याने लोकांचा शोध घेतला जात आहे.

Cruise ship capsizes in Jabalpur, MP, 6 bodies found; More than 15 missing, 19 rescued

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात