भारतीय जनता पक्षाचा नवा विश्वविक्रम, ट्विटरवर ठरला जगातील सर्वात मोठा पक्ष, 2 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार


प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टी (बीजेपी) ने सोशल मीडियावर नवा वर्ल्ड रिकॉर्ड केला आहे. ट्विटरवर भाजपचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. भाजपने ट्विटरवर 20 मिलियन म्हणजेच 2 कोटींहून अधिक फॉलोअर्सचा आकडा गाठला आहे. या आकडेवारीच्या आधारे भाजप आता ट्विटरवर जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. भारतातच काय जगात कोणत्याही पक्षाला एवढे फॉलोअर्स नाहीत.Bharatiya Janata Party’s new world record, became world’s largest party on Twitter, crossed 2 crore followers



अहवालानुसार, राजकीय पक्ष म्हणून भाजपचे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. भाजपचे 20 मिलियन म्हणजेच 2 कोटी फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचे इतके फॉलोअर्स नाहीत. या नव्या विक्रमाची माहिती भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी दिली आहे. या यशाबद्दल त्यांनी सर्व फॉलोअर्सचे अभिनंदन केले आहे. ट्विटरवरील फॉलोअर्सच्या बाबतीत भाजपकडे काँग्रेसपेक्षा दुप्पट लोक आहेत. काँग्रेसला 9.2 मिलियन म्हणजेच 1 कोटींहून कमी लोक फॉलो करतात. जगातील इतर देशांबद्दल बोलायचे झाले तर रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिकेचे एकूण 3.2 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर डेमोक्रॅटिक पक्षाला जवळपास 2.3 मिलियन लोक फॉलो करतात.

सोशल मीडियावरही भारताचे पंतप्रधान मोदीही सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. पीएम मोदींचे फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर जगातील इतर कोणत्याही नेत्यापेक्षा सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत. भारतात कोणत्याही नेत्याचे इतके फॉलोअर्स नाहीत.

Bharatiya Janata Party’s new world record, became world’s largest party on Twitter, crossed 2 crore followers

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात