विशेष प्रतिनिधी
मुंबई: आर्यन खान हा ड्रग्जचे सेवन नेहमी करतो असा दावा NCb ने सुनावणी मध्ये केला आहे. आर्यनसह पाच आरोपींना आता कॉमन सेल मध्ये ठेवण्यात आले आहे. आर्यन खानच्या जामीनावर
Aryan Khan Drug Addict? Aryan Khan Drug case latest updates
आज सत्र न्यायालयात सुनावणी आहे. एनसीबीच्या प्रश्नांना १३ ऑक्टोबरला आर्यनच्या वकिलांनी उत्तरे दिली. एएसजी अनिल सिंह यांनी एनसीबीच्या वतीने जामीन का मिळू नये यासाठी युक्तिवाद केला होता. आजच्या सुनावणीत सिंह यांनी उर्वरित मुद्दे मांडले आहेत.
२ ऑक्टोबर रोजी कार्डेलिया क्रूजवरील छाप्यात आर्यनला ताब्यात घेतले आहे. अरबाज मर्चंटकडून काही प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. आर्यन व अरबाज एका खोलीत राहणार होते. आर्यनने अरबाजकडे सापडलेल्या ड्रग्स आम्ही घेणार होतो असे कबूल केले आहे असे एनसीबी चे म्हणणे आहे.
Aaryan Khan Drugs Case : आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ; जामिनासाठी अर्ज करण्याचे कोर्टाचे आदेश
आर्यनचे आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंग लिंक बरोबर संबंधांचे संकेत एनसीबीला मिळाले आहेत. या जामीन अर्जाविरुद्ध एका सामाजिक कार्यकर्त्यानी हस्तक्षेप अर्ज केला होता. हस्तक्षेप अर्जात दावा केला आहे की ड्रग्सचा पूर्ण देशावर परिणाम होत आहे व सुनावणी झाली पाहिजे. या हस्तक्षेप अर्जाला आर्यनच्या वकिलांनी विरोध केला होता. विशेष एनडीपीएस न्यायालयाने सदर अर्ज फेटाळला आहे.
एएसजी अनिल सिंह यांचा युक्तिवाद:
कोर्टापुढे ठेवलेल्या रेकॉर्ड व पुराव्यावरून असे दिसते की, तो प्रतिबंधीत पदार्थांचा नियमित ग्राहक आहे. अर्जदारासोबत (आर्यन) असलेल्या अरबाजकडे प्रतिबंधीत साहित्य सापडले. एनसीबी तर्फे अनिल सिह यांनी न्यायालयाला सांगितले की, अर्जदाराकडे काही सापडले नाही हा युक्तिवाद योग्य असू शकत नाही. एनडीपीएस कायद्यांतर्गत सर्व गुन्हे अजामीनपात्र आहेत असे मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देऊन त्यांनी सांगितले. या प्रकरणात आचित व शिवराज ड्रग डिलर आहेत. त्यामुळे या केसमध्ये जामीन मंजूर केला जाऊ शकत नाही. आर्यन व उर्वरित आरोपींचा कोविड अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना कॉमन सेल मध्ये ठेवले आहे असे ऑर्थर रोड कारागृहाचे अधिक्षक नितीन वायचळ यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App