Aaryan Khan Drugs Case : आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ; जामिनासाठी अर्ज करण्याचे कोर्टाचे आदेश


शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. Aaryan Khan Drugs Case


विशेष प्रतिनिधी

मुंबई:  क्रूझ ड्रग्स केस प्रकरणात अडकलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला आज (7 ऑक्टोबर) पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. ड्रग्स प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होत आहे. सुनावणीदरम्यान, आरोपींची कोठडी एनसीबीने 11 ऑक्टोबरपर्यंत मागितली होती. आज कोर्टाने आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आणि तसंच जामिनासाठी अर्ज करण्यासही सांगितलं आहे.Aaryan Khan Drugs Case

NCB ने सांगितले की क्रूज ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. एनसीबीने म्हटले की, आर्यनने नाव घेतल्यानंतर या प्रकरणात अचित कुमार याची अटक झाली आहे. अरबाज मर्जेंटनेही त्याचे नाव घेतले होते. याबाबतची चौकशी करण्यासाठी एजन्सीला आरोपीची कस्टडी वाढवून हवी असल्याचं सांगितलं.4 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत आर्यनला जामीन मंजूर झाला नाही. त्याऐवजी त्याला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत ठेवण्याचा निर्णय देण्यात आला होता. दरम्यान, आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे हे आज पुन्हा एकदा त्याला जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न करतील. आजच्या सुनावणीत शाहरुखचा मुलगा आर्यनला जामीन मिळतो की नाही याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

एनसीबीने आर्यनवर केले आहेत गंभीर आरोप
ड्रग्ज प्रकरणी 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या. एनसीबीच्या वतीने, न्यायालयात सांगण्यात आलं होतं की, आर्यन खानच्या मोबाइलमध्ये काही आक्षेपार्ह फोटो आणि चॅट्सच्या लिंक सापडल्या आहेत. ज्यासाठी एनसीबीने पुढील चौकशीसाठी 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी मागितली होती. तथापि, न्यायालयाने आर्यन खान आणि इतर दोघांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत राहण्याचे आदेश दिले होते.

एनआयसीबीने आर्यनच्या चॅट्समध्ये अनेक कोड नेम सापडल्याचा दावा-
सुनावणीत, एनसीबीच्या वतीने दावा करण्यात आला होता की, आर्यनच्या फोनवरून चॅटिंगच्या स्वरूपात अनेक लिंक्स सापडले आहेत, जे आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीकडे निर्देश करतात. एनसीबीने म्हटले होते – चॅट्समध्ये अनेक कोड नेम देखील सापडले आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी कोठडी आवश्यक आहे.
NCB ने पुढे म्हटले होते की, लिंक आणि संबंध उघड करण्यासाठी कस्टडी आवश्यक आहे. ड्रग्स तस्करांसोबत व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह चॅट करण्यात आलं होतं. या प्रकरणात अजूनही छापे सुरू आहेत. आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये पैशांचे व्यवहार उघड केल्याची बाबही समोर आले आहेत.

Aaryan Khan Drugs Case

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”