captain amarinder singh vs cm charanjit singh channi on bsf power jurisdiction

बीएसएफच्या अधिकार क्षेत्रात वाढीवर पंजाबचे आजी-माजी मुख्यमंत्री भिडले, कॅप्टन म्हणाले – देश मजबूत होईल, तर चन्नींचे केंद्रावर आरोप

BSF Power Jurisdiction : पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय जुगलबंदी पाहायला मिळत आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी आमनेसामने आले आहेत. सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) अधिक अधिकार देण्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला आहे. एकीकडे, सीएम चन्नी यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. captain amarinder singh vs cm charanjit singh channi on bsf power jurisdiction


प्रतिनिधी

चंदिगड : पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय जुगलबंदी पाहायला मिळत आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी आमनेसामने आले आहेत. सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) अधिक अधिकार देण्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला आहे. एकीकडे, सीएम चन्नी यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

वास्तविक, केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाब सीमेवर तैनात बीएसएफच्या अधिकार क्षेत्रात वाढ केली आहे. बीएसएफ आता पाकिस्तानच्या सीमेवर भारतीय हद्दीत 50 किमीपर्यंत कोणतीही कारवाई करण्यास सक्षम असेल. आता बीएसएफला शोध घेण्याचे, संशयितांना अटक करण्याचे आणि जप्ती करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. पूर्वी बीएसएफ फक्त 15 किलोमीटरपर्यंत काम करू शकत होते.

पण केंद्र सरकारच्या या निर्णयाला पंजाबमध्ये विरोध सुरू झाला आहे. अनेक राजकीय पक्षांनी केंद्राच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी ट्वीट केले, ‘केंद्र सरकारचा हा निर्णय संघीय रचनेवर थेट हल्ला आहे. बीएसएफला 50 किमीपर्यंत कार्य करण्याचा अधिकार देण्याचा निर्णय तर्कहीन आहे. मी गृहमंत्री अमित शहा यांना विनंती करतो की, हा निर्णय मागे घ्यावा.

त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनीही या निर्णयाला विरोध केला. ते म्हणाले, ‘मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना हा निर्णय मागे घेण्याची विनंती करतो. सरकारच्या मनात काय चालले आहे ते मला समजत नाही. हा आमच्या अधिकारांवर हल्ला आहे. रंधावा यांनी केंद्राच्या या निर्णयाला तर्कहीन म्हटले आहे.

मात्र, माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी सुरक्षा दलांना राजकारणात खेचू नये असे बोलले आहे. त्यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी ट्विट करत कॅप्टनच्या वक्तव्याचा संदर्भ देत म्हटले की, ‘काश्मीरमध्ये आमचे सैनिक शहीद होत आहेत. पाकिस्तान समर्थित दहशतवादी पंजाबला शस्त्रे आणि ड्रग्ज पाठवत असल्याचे आपण पाहत आहोत. अशा परिस्थितीत बीएसएफची उपस्थिती आणि वाढलेली शक्ती देशाला मजबूत बनवेल. कॅप्टन असेही म्हणाले की, जेव्हा भारताच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला राजकारणाच्या पलीकडे पाहावे लागते.

या मुद्द्यावर, पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड हे त्यांच्याच पक्षाला घेरताना दिसले. त्यांनी ट्वीट केले, ‘मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी काही बोलण्यापूर्वी विचार करावा, ते काय मागत आहेत. पंजाबचा 25 हजार चौरस किमी भाग बीएसएफच्या अखत्यारीत आला आहे. पंजाब पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी या निर्णयामागे केंद्र आणि राज्य सरकारची मिलीभगत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, केंद्राला राज्याच्या संमतीशिवाय एवढा मोठा निर्णय घेणे शक्य नाही. त्यांनी आरोप केला की, चन्नी आणि त्यांचे सहकारी आता निर्णयामागील सहभाग लपवण्यासाठी आवाज काढत आहेत. बादल म्हणाले की, मुख्यमंत्री चन्नी यांनी गेल्या आठवड्यात अचानक गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती आणि या बैठकीमुळे या निर्णयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

captain amarinder singh vs cm charanjit singh channi on bsf power jurisdiction

महत्त्वाच्या बातम्या