दसरा मेळाव्यासाठी संघ दक्ष, नागपुरात जय्यत तयारी ; सरसंघचालक डॉ. भागवत यांचे मौलिक विचार ऐकण्याची संधी


वृत्तसंस्था

नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून सगळे कार्यक्रम ऑनलाईन होत होते. कोरोनाच्या संकटामुळे दसरा मेळाव्यावर मोठे निर्बंध आले होते. नागपूरच्या संघ मुख्यालयात होणाऱ्या दसऱ्याचा कार्यक्रमाकडे तमाम जनतेचे लक्ष लागले आहे. त्याची जय्यत तयारी सुरु आहे. Sangh Daksh for Dussehra Mela, triumphant preparations in Nagpur; Opportunity to hear Sarsanghchalak Dr. Bhagwat’s thoughts

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. यावेळी ते स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचे मौलिक विचार ऐकण्यासाठी स्वयंसेवक आणि जनता आतुर असते. संघाच्या दासऱ्या मेळाव्यातील सरसंघचालकांच्या विचारांची शिदोरी घेऊन स्वयंसेवक नव्या उर्मीने वाटचाल करतात. नागपूरच्या संघ मुख्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदा कोरोना नियमावली पाळून हा मेळावा होणार आहे. त्यासाठी स्वयंसेवक नागपूरकडे रवाना होत आहेत.



महिलांचा सहभाग मुद्यावर मेळाव्यात घोषणा ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आता महिलांचा समावेश होण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याला कारणही तसेच आहे. संघप्रमुख मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी याबाबतचे संकेत दिले होते. त्यामुळे आता येत्या दसरा मेळाव्यात ते याबाबत महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत यांनी म्हटलं होतं, “संघाचा उद्देश हिंदू समाजाला एकजूट करणं आहे. पण आम्ही जेव्हा कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा तिथे केवळ पुरषचं दिसतात. जर आपल्याला संपूर्ण समाज एकजूट करायचा असेल तर या कार्यक्रमात कमीत कमी ५० टक्के महिलांना समावून घ्यावं लागेल. भागवतांच्या या विधानावर काही राजकीय विश्लेषकांनी विश्लेषण करताना म्हटलं की, रा. स्व. संघ आपल्या संघटनेत महिलांच्या प्रवेशाची तयारी करत आहे? अमर उजालानं याबाबत वृत्त दिलं आहे.

Sangh Daksh for Dussehra Mela, triumphant preparations in Nagpur; Opportunity to hear Sarsanghchalak Dr. Bhagwat’s thoughts

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात