विशेष प्रतिनिधी
जयपूर : राजस्थानातला काँग्रेसचा माजी आमदार मेवाराम जैन हा अल्पवयीन मुलींवर बलात्कार करायचा कोणीही नकार दिला तर तो त्यांचा अमानुष छळ करायचा, तो आणि त्याचे गुंड त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठ्या घालायचे. After Abreu went on social media, up to the Congress
या भयानक प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजस्थानात प्रचंड खळबळ उडाली. काँग्रेसची पुरती अब्रू गेली. त्यामुळे पक्षाला उपरती झाली आणि पक्षाने लाजे काजेस्तव मेवाराम जैनवर अखेर निलंबनाची कारवाई केली.
राजस्थानातल्या आधीच्या काँग्रेसच्या अशोक गेहलोत सरकारला या सर्व प्रकारची माहिती असूनही सरकारने मेवाराम जैन आणि त्याच्या गुंडांवर कारवाई केली नव्हती. इतकेच नाही तर दस्तूर खुद्द राहुल गांधींना या घृणास्पद प्रकाराची माहिती कळल्यानंतर देखील मेवाराम जैन याचे तिकीट न कापता उलट त्याला विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळावे यासाठी त्यांनी स्वतः लक्ष घातले होते.
पण आता राजस्थानात सरकार बदलले असल्याने मेवाराम जैन याला त्याच्या गुन्ह्यांची कायदेशीर शिक्षा देण्यासाठी त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई सुरू झाली. आता मेवाराम कायद्याच्या कचाट्यातून वाचणार नाही. काँग्रेसवर त्याची सगळी प्रकरणे शेकतील, हे लक्षात आल्यानंतर मेवाराम जैनला पक्षाने “अनैतिक कृत्यांबद्दल” जबाबदार धरून निलंबित केले.
– बारमेरचा आमदार
70 वर्षांचा मेवाराम जैन हा काँग्रेसचा बारमेर मधला आमदार होता. त्याचे सगळे अश्लील धंदे काँग्रेस हायकमांडसकट सगळ्यांना माहिती होते, तरी देखील काँग्रेस हायकमांड त्याच्यावर मेहरबान असल्याने अशोक गेहलोत सरकारने त्याच्यावर कधी कारवाई केली नव्हती. मात्र त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. मेवाराम याच्या विरोधात पीडित महिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली त्यांना स्टेटमेंट दिले. त्यानंतर मेवारामने धावपळ करून कोर्टातून अटकपूर्व जामीन मिळवला, पण दरम्यानच्या काळात व्हिडिओ व्हायरल झाल्याने मेवाराम आणि काँग्रेस दोन्ही अडचणीत आले. त्यामुळे काँग्रेसने आपले अंग झटकण्यासाठी मेवाराम जैनला पक्षातून निलंबित केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App