विशेष प्रतिनिधी
रायगड : शासन आपल्या दारी या राज्यशासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रमाचा पुढचा टप्पा आज रायगड जिल्ह्यात पार पडला. रायगड जिल्ह्यातील 26 लाख लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून 1700 कोटी रुपयांचे लाभ मिळवून देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरी उपमुख्यमंत्री अजित पवार आदी नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. Raigad district through aaplya Dari program
कोकण भूमीतील तरुणांना याच भूमीत काम मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असून कोका कोला, जेएसडब्यूचा 20000 कोटींचा विस्तारित प्रकल्प असे अनेक प्रकल्प यावेत यासाठी शासन प्रयत्नशील आहे. रायगड जिल्ह्यातील पाचाड येथे भव्य शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी रुपये मंजूर केले आहेत.
तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पावनखिंड प्रदक्षिणा मार्गावर विश्रांतीगृह उभारण्यासाठी १५ कोटी रुपये मंजूर केले असल्याचे सांगितले. यासोबतच मुंबई-गोवा महामार्गाचे रायगड जिल्ह्यातील रखडलेले काम माननीय कोर्टाने दिलेल्या मुदतीच्या आत नक्की पूर्ण होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, निरंजन डावखरे, प्रशांत ठाकूर, अनिकेत तटकरे तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App