पाकिस्तानात लोकशाहीची पुन्हा हत्या, नॅशनल असेंब्लीची निवडणूक बेमुदत पुढे ढकलली; लष्करी राजवटीचा धोका वाढला!!

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानात लोकशाहीची पुन्हा हत्या झाली आहे. पाकिस्तान नॅशनल सिनेटने एक ठराव मंजूर करून पाकिस्तान नॅशनल असेंब्लीची सार्वत्रिक निवडणूक बेमुदत पुढे ढकलली आहे. देशाची आर्थिक स्थिती आणि सुरक्षा स्थिती खराब आहे हे कारण देऊन सिनेटने बहुमताने निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव मंजूर केला. The National Assembly elections were postponed indefinitely

त्यामुळे आता पाकिस्तानात नियोजित वेळेनुसार 8 फेब्रुवारी रोजी निवडणुकीत मतदान होणार नाही. त्यामुळे काळजीवाहू सरकार किमान बेमुदत काळापर्यंत तसेच चालू राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पाकिस्तानात लष्करी उठावाचा धोकाही वाढला आहे.

सध्या पाकिस्तान आर्थिक, सामाजिक अस्थिरतेतून जात आहे. अशा स्थितीत तेथे अन्वर अल हक काकर हे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून देशाचा कारभार हाकत आहेत. देशात शांततेत सार्वत्रिक निवडणुका घेण्याची प्रमुख जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र पाकिस्तामध्ये सध्या असलेली परिस्थिती पाहता ही निवडणूक वेळेवर घेणे शक्य नाही, असे सिनेटने केलेल्या ठरावात नमूद केले आहे. ठरावाला इमरान खान यांच्या तेहरी के पाकिस्तान या पार्टीने विरोध केला आहे.

निवडणुकीची तारीख ८ फेब्रुवारी २०२४

अन्वर अल हक काकर यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून ९० दिवसांत सार्वत्रिक निवडणुका घेणे अनिर्वाय असताना या निवडणुका टळल्या आहेत. काकर यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पाकिस्तानी निवडणूक आयोगाने ८ फेब्रुवारी २०२४ ही मतदानाची तारीख निश्चित केली होती. मात्र सध्या पाकिस्तानसमोर आर्थिक अस्थिरता, राजकीय अस्थितरता, महागाई अशी अनेक संकट आ वासून उभी आहेत. त्यामुळे या देशात ठरल्याप्रमाणे वेळेवर निवडणूक होणार का??, असा प्रश्न उपस्थित झाला होता. सिनेटच्या ठरावाने या प्रश्नाला तात्पुरते उत्तर मिळाले आहे.

लष्करी राजवटीचा धोका

पण त्या पलीकडे जाऊन पाकिस्तानात लष्करी उठावाची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी डिसेंबर 2023 मध्ये अमेरिकेचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी व्हिक्टोरिया न्यूलँड यांची भेट घेतली होती. ही भेट पाकिस्तानच्या एकूण राजकीय आणि सामाजिक भवितव्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची मानली जात होती, असे मुनीर आणि न्यूलँड यांच्या भेटीतच पाकिस्तानातल्या निवडणुका टाळून तिथे लष्करी राजवट आणायची असे घाटले गेल्याचे पाकिस्तानात बोलले जात आहे.

पण थेट लष्करी राजवट आणण्यापेक्षा सिनेट कडून निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव आणावा आणि त्यानंतर अधिकृत घोषणा न करता लष्करी राजवटीचा मुलकी प्रशासनात प्रभाव निर्माण करावा, असा पाकिस्तानी लष्कराचा इरादा असल्याचे पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

The National Assembly elections were postponed indefinitely

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात