सोमालियाजवळ ‘लीला’ जहाजाचे अपहरण, जहाजावर 15 भारतीय क्रू मेंबर्स!

INS चेन्नई बचावासाठी रवाना, नौदलाची विमाने जहाजावर लक्ष ठेवून आहेत


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने सोमालियाच्या किनार्‍याजवळ एमव्ही लीला नॉरफोक या जहाजाचे अपहरण केल्याप्रकरणी मोठे पाऊल उचलले असून आयएनएस चेन्नईला त्या दिशेने पाठवले आहे. अपहरण झालेल्या जहाजाच्या क्रू मध्ये 15 भारतीय सदस्यांचाही समावेश आहे.MV Leela Norfolk ship hijacke in Somalia 15 Indian crew members on board



वृत्तसंस्था एएनआयने लष्करी अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस चेन्नई अपहरणाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अपहरण झालेल्या जहाजाच्या दिशेने जात आहे. यापूर्वी लष्करी अधिकाऱ्याने सांगितले होते की, ‘भारतीय नौदल अपहरण झालेल्या ‘एमव्ही लीला नॉरफोक’ या जहाजावर बारीक लक्ष ठेवून आहे, याची माहिती गुरुवारी संध्याकाळी मिळाली.

सोमालियाच्या किनार्‍याजवळ अपहरण करण्यात आलेल्या लायबेरियन ध्वजांकित जहाजावर 15 भारतीय क्रू मेंबर्स होते. भारतीय नौदलाची विमाने जहाजावर लक्ष ठेवून आहेत आणि चालक दलाशी संवाद प्रस्थापित झाला आहे.

MV Leela Norfolk ship hijacke in Somalia 15 Indian crew members on board

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात