‘ये एक सही कदम हैं’ ; पीएम मोदींनी बूस्टर डोसची घोषणा केल्यावर राहुल गांधींनी ट्विटद्वारे दिली प्रतिक्रिया


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रंटलाइन वर्कर्ससाठी, आरोग्य सेवांसाठी बूस्टर डोसची घोषणा केली.’These are the right steps’; Rahul Gandhi reacted to PM Modi’s announcement of booster dose via tweet


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट संपत नाही तोपर्यंत च त्यात आणखी भर पडली ती ओमिक्रॉनची.दरम्यान या संकटांतून बाहेर पडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री दिलासादायक घोषणा केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रंटलाइन वर्कर्ससाठी, आरोग्य सेवांसाठी बूस्टर डोसची घोषणा केली.यासोबतच ६० वर्षांहून अधिक वयोगटातील गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या वृद्धांना डॉक्टरांच्या सल्ल्याने खबरदारीचा डोस देण्याची घोषणाही करण्यात आली.



तसेच सगळ्यांनी सावध राहणे , काळजी घेणे, सतत मास्क लावणे , हात धुवायला विसरायचं नाही असा सल्ला देखील मोदींनी दिला आहे.दरम्यान पंतप्रधान मोदींच्या बूस्टरच्या या निर्णयावर विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत असून त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.

यावेळी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पीएम मोदींनी केलेली बूस्टर डोसची घोषणा योग्य पाऊल असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले- केंद्र सरकारने बूस्टर डोसची माझी सूचना मान्य केली आहे – हे योग्य पाऊल आहे. लसी आणि बूस्टरची सुरक्षा देशातील लोकांपर्यंत पोहोचवावी लागेल.

‘These are the right steps’; Rahul Gandhi reacted to PM Modi’s announcement of booster dose via tweet

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात