शिवसेनेत फूट : आमदारच नव्हे, तर खासदारही फुटताहेत; राजन विचारे, भावना गवळी, कृपाल तुमाने, राजेंद्र गावित शिंदे गटात!!


प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेच्या आमदारांमध्ये आता दोन-तृतीयांश पेक्षा अधिक फूट पडली असून तब्बल 41 आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाल्याची बातमी आहे. पण त्या पलिकडे जाऊन आता फक्त आमदारच नव्हे, तर खासदारही फुटायला लागल्याचे दिसत आहे.Shiv Sena splits: Not only MLAs, but also MPs are split; Rajan Vichare, Bhavana Gawli, Kripal Tumane, Rajendra Gavit in Shinde group

शिवसेनेचे आक्रमक मंत्री गुलाबराव पाटील आणि कोकणातले माजी मंत्री दीपक केसरकर हे गुवाहाटीत दाखल झाले आहेत. त्याचबरोबर संभाजीनगरचे आमदार आशिष जयस्वाल देखील 3 आमदारांसह गुवाहाटीत पोहोचले आहेत. त्यामुळे शिंदे गटातल्या आमदारांची संख्या 41 वर पोहोचली असून ही संख्या फुटीच्या कायदेशीर अधिमान्यतेसाठी 37 पेक्षा 4 ने जास्त आहे.एकीकडे एकनाथ शिंदे गट आमदारांनी असा मजबुत होत असताना दुसरीकडे शिवसेनेचे खासदार देखील आता हलत आहेत वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची मागणी मान्य करा, असे पत्र उद्धव ठाकरे यांना पाठवून आधीच आपला कल स्पष्ट केला आहे. त्या पाठोपाठ आता ठाण्याचे खासदार राजन विचारे, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आणि पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी देखील उघडपणे एकनाथ शिंदे यांचे समर्थन केल्याच्या बातम्या आल्या आहेत.

– ठाकरे गटाकडे 14 आमदार

या फुटीमुळे शिवसेनेत फक्त 14 आमदार उरल्याची बातमी असून सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची बैठक देखील रद्द केल्याची बातमी आहे. उद्धव ठाकरे यांना कोरोना झाला असल्यामुळे ते बैठकीत सामील होऊ शकणार नाहीत म्हणून बैठक रद्द केल्याचे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

– उद्धव ठाकरे गटाची बैठक रद्द

उद्धव ठाकरे यांना कोरोना झाल्यामुळे ते वर्षा बंगला सोडताना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी राजभवनावर गेले नव्हते त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा वर्षा बंगल्यातल्या टेबलावर ठेवला आहे मातोश्री जाताना ते बंद गाडीतून गेले असले तरी प्रचंड गर्दी त्यांच्याभोवती होती मात्र आता कोरूना झाल्याने शिवसेनेच्या उरलेले आमदारांची बैठक रद्द केल्याचे उद्धव ठाकरे गटाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

Shiv Sena splits: Not only MLAs, but also MPs are split; Rajan Vichare, Bhavana Gawli, Kripal Tumane, Rajendra Gavit in Shinde group

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”