कोणी एटीएस मध्ये येता एटीएसमध्ये, राज्याच्या पोलीस महासंचालकांची विनवणी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोणी एटीएस मध्ये येता एटीएसमध्ये अशी विनवणी करण्याची वेळ राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यावर आली आहे. त्यांनी आपल्याफेसबुक पेजवर राज्यातील दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) एसपीच्या दोन रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यांनी इच्छुक उमेदवारांना विभागाशी संपर्क साधावा किंवा सोशल मीडियाद्वारे त्यांचे अर्ज पाठवण्यास सांगितले आहे.Fwd: Anyone coming to the ATS , pleading the state’s director general of police

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी राज्य सरकारला पत्र लिहून एटीएससाठी आणखी टीम सदस्यांची मागणी केली होती. मात्र, संजय पांडे यांच्या या पोस्टवर अग्रवाल यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. गेल्या आठवड्यात फेसबुक पेजवर डीजीपी संजय पांडे यांनी लिहिले होते की, एटीएस, मुंबईमध्ये पोलिस अधीक्षक (एसपी) ची दोन पदे रिक्त आहेत. एटीएस पोस्टिंग ही एक प्रतिष्ठित पोस्टिंग आहे. ज्यात 25% विशेष भत्ता आहे. इच्छुक अधिकारी थेट एडीजी एटीएस किंवा एडीजी सोबत संपर्क साधू शकतात.



मात्र, आतापर्यंत फारशा लोकांनी एटीएसकडे जाण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही. अनेक वर्तमान आणि माजी एटीएस अधिकाºयांनीनी सांगितले की, राज्याच्या दहशतवादविरोधी युनिटने गेल्या काही वर्षांत आपली चमक गमावली आहे. कारण केंद्राच्या राष्ट्रीय तपास संस्थेद्वारे (एनआयए) अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणांची चौकशी केली जात आहे.

आता एटीएसकडे अधिका-यांचा कल कमी होत असल्याचे हे एक प्रमुख कारण आहे. इतकेच नव्हे तर केंद्र आणि राज्य यांच्यातील सततच्या भांडणामुळे केंद्र आणि राज्याच्या एजन्सींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम झाल्याचे माजी वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे राज्याच्या यंत्रणांबाबत लोकांचा भ्रमनिरास होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) मनु कुमार श्रीवास्तव यांना सांगितले की, एटीएसमध्ये चार महत्त्वाची पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत आणि ती लवकरच भरली जावीत. एटीएसचे एसपी (टेक्निकल विश्लेषक) सोहेल शर्मा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले आहेत.

एटीएसमधील आणखी एक एसपी दजार्चे अधिकारी राजकुमार शिंदे यांची काही काळापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये (एसीबी) बदली करण्यात आली होती, परंतु त्यांना अद्याप एटीएसमधून मुक्त करण्यात आलेले नाही. सुहास वारके यांच्याकडे एटीएसचे आयजी पद होते, मात्र वर्षभरापूर्वी त्यांची बदली झाली. तेव्हापासून हे पदही रिक्त आहे. तसेच एटीएस डीआयजीचे पदही रिक्त असल्याने शिवदीप लांडे यांना नोव्हेंबरमध्ये बिहारला पाठवण्यात आले आहे.

एटीएस हा अतिशय प्रतिष्ठित विभाग आहे. प्रत्येकाला त्यात काम करायचे आहे. कोणतीही इच्छुक व्यक्ती त्याच्या फेसबुक अकाऊंटवर डीजीला उत्तर देणार नाही कारण इतर अधिकाऱ्यांनाही याची माहिती मिळेल, असे एका अधिकाºयाने सांगितले.

माजी एटीएस अधिकारी म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र एटीएस इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संबंधित अनेक प्रकरणे हाताळत आहे. त्यात 2014 मध्ये कल्याण आणि 2015 मध्ये मालवणीतील तरुणाचाही समावेश होता. मात्र, काही काळापूर्वी ही दोन्ही प्रकरणे एनआयएकडे वर्ग करण्यात आली होती.

एटीएसने 2006 आणि 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणांचा तपास केला आणि आरोपपत्रही दाखल केले. मात्र, ही दोन्ही प्रकरणे नंतर त्यांच्याकडून ताब्यात घेऊन एनआयएकडे सोपवण्यात आली.महाराष्ट्र एटीएसने अँटिलिया स्फोटके रिकव्हरी प्रकरणात चांगले काम केले.

युरेनियम रिकव्हरी प्रकरणाचाही एटीएसच्या पथकाने खुलासा केला होता आणि मनसुख हिरेनच्या मृत्यूबाबतही अनेक महत्त्वाचे क्लूस सापडले होते, परंतु हे प्रकरण देखील त्यांच्या हातून हिसकावून एनआयएकडे सोपवले. हे अत्यंत निराशाजनक होते आणि त्यामुळे एटीएस अधिकाºयांचे मनोधैर्य खचले.

Fwd: Anyone coming to the ATS , pleading the state’s director general of police

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात