हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान ; सहयाद्री देवराईचा व्हॅलेंटाईन डे राष्ट्रीय वृक्ष वडासोबत


विशेष प्रतिनिधी

पुणे / सातारा : सुमारे शंभर वर्ष वयाच्या, पण मालकाला नकोशा झाल्याने कुऱ्हाड कोसळलेल्या हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या ‘सह्याद्री देवराई ‘ संस्थेला यश आले. वृक्षांचे मानवतेशी असलेले श्वासाचे नाते चिरंतन रहावे म्हणून १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत म्हसवे ( डी मार्ट जवळ,ता. सातारा ) येथे या वटवृक्ष सोबत अनोखा ‘व्हलेंटाईन डे ‘ साजरा करण्यात आला. Banyan tree of Hadapsar saved his life through transplantation in Satara Valentine’s Day of Sahyadri Devrai with National Tree

शंभर वर्षाचे झाड पुनरुज्जीवन करायला फक्त २५ हजार खर्च आला. अडचण होते, म्हणून ही झाडे काढून टाकून देता कामा नये. वड हा राष्ट्रीय वृक्ष आहे. त्याचे सन्मानाने २६ जानेवारी रोजी म्हसवे ( सातारा ) येथे पुनर्रोपण करण्यात आले. निवडणुकीत जिंकला तरी एखाद्याची आपण मिरवणूक काढतो, इथे तर शंभर वर्षाचा राष्ट्रीय वृक्ष वाचला आहे. म्हणून त्याच्या पालवी सोबत प्रार्थना करण्यात आली. सुवासिनींनी पूजा केली. सयाजी शिंदे यांनी वटवृक्षाला अभिषेक केला.

तसेच २० हुतात्मा जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ २० झाडे लावण्यात आली. वृक्षाची महती सांगणारी गाणी गाण्यात आली. कवी विठ्ठल वाघ यांनी ‘ झाड वडाचे ताठ उभे ‘ हे गीत या समारंभासाठी पाठवले होते. त्याचे गायन करण्यात आले.

सहयाद्री देवराई संस्थेचे संस्थापक सयाजी शिंदे म्हणाले, ‘ अडचण होत आहे असे समजून वड कापायला निघालेल्या हडपसरच्या एका व्यक्तीकडून आम्ही शंभर वर्ष वयाचा हा वटवृक्ष शास्रोक्त पद्धतीने पुनर्रोपणासाठी हलवला. लांब ट्रकमधून साताऱ्याला गोळीबार मैदान,म्हसवे येथे नेवून पुनर्रोपण केले. त्याला जीवदान मिळून पालवी फुटली आहे.व्हलेंटाईन डे ला आम्ही सर्व वृक्षप्रेमी नागरिक, वारकरी, विद्यार्थी या पालवी फुटलेल्या वटवृक्षा भोवती जमून त्याचे कोडकौतुक केले. रस्त्यांच्या कामात कापले जाणारे वृक्ष अशा पध्दतीने वाचवले पाहिजेत. सरकारनेही पुढाकार घेतला पाहिजे. रानाला आग लावणे, पेटवणे, वणवे प्रकार थांबले पाहिजेत. ‘ जंगल में फायर नही, फ्लॉवर होना चाहिए ‘

संस्थेचे विश्वस्त धनंजय शेडबाळे,पानसरे नर्सरी ( श्रीगोंदा ) चे संचालक बाळासाहेब पानसरे, जिल्हा पोलिस प्रमुख अजय बन्सल,श्रीकांत इंगळहळीकर, धनंजय शेडबाळे,मुकेश धीवर, मनोज बाविसकर, सुजीत जगदाळे,बाळासाहेब पानसरे , भानुदास गायकवाड, डॉ. रोशनआरा शेख, प्रा. तानाजी देवकुळे, प्रा.केशव पवार, प्रा.डॉ. बाबासाहेब कांगुने, डॉ. सचिन माने, प्रा. रवींद्र महाजन, प्रा. रामचंद्र गाडेकर , राजेंद्र आफळे, प्रा. विजय निंबाळकर, शाहीर चरण उपस्थित होते.

Banyan tree of Hadapsar saved his life through transplantation in Satara Valentine’s Day of Sahyadri Devrai with National Tree

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात