JAY SHRI RAMA : भव्य-दिव्य-एकमेव अद्वितीय-करोडो हिंदूंची आस्था करोडोंचे स्वप्न ! डोळ्यांचे पारणे फेडणारे 3D राम मंदिर ..पाहा व्हिडिओ


अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर कसे असेल, हे जाणून घेण्यासाठी जगभरातील हिंदूंच्या मनात मोठी उत्सुकता आहे.

आता ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र’ ट्रस्टने एक व्हिडिओ जारी केला आहे आणि अयोध्येतील राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर आतून आणि बाहेरून कसे दिसेल ते सांगितले आहे.


विशेष प्रतिनिधी

अयोध्या: श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी राम मंदिराचा एक नवीन थ्रीडी व्हिडिओ जारी केला आहे. ६ मिनिटे आणि २२ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये राम मंदिराच्या बांधकामानंतर मंदिर किती सुरेख आणि भव्य दिसेल हे या व्हीडिओतून सादर करण्यात आले आहे.Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra Trust releases 3D preview of the grand Ram Mandir in Ayodhya

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’चे सरचिटणीस आणि ‘विश्व हिंदू परिषदे’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष चंपत राय यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. शेअर करताना ट्रस्टने लिहिले की, “प्रभू श्री रामाचे जन्मस्थान जेव्हा बांधले जाईल तेव्हा एक दैवी आणि भव्य मंदिर कसे दिसेल याची तुम्हा सर्वांना उत्सुकता असेल. तुम्हाला या भव्य आणि दैवी कलाकृतीची कल्पना देण्यासाठी, आम्ही 3D व्हिडिओद्वारे ते प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला आहे. जय श्री राम!”

एकेकाळी अयोध्येत राममंदिर उभारणीची संकल्पना फार दूरची होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या ९ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या निर्णयानंतर रामजन्मभूमीवर मंदिर उभारणीची प्रक्रिया प्रगतीपथावर सुरू आहे. आता थ्रीडी व्हिडिओच्या माध्यमातून हे स्वप्न साकार होताना बघता येत आहे.

गेल्या वर्षी १५ जानेवारीपासून सुरू झालेल्या बांधकाम प्रक्रियेअंतर्गत ४५ ते ५० फूट खोल पाया आणि त्यावर पाच फूट जाडीचा आणखी एक थर टाकण्यात आला असून २४ जानेवारीपासून मंदिराच्या २१ फूट उंचीच्या पायाचे बांधकाम सुरू झाले आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमीचे मंदिर अतिशय भव्यदिव्य आहे. येथील संकुलात भव्य मंदिरासह सांस्कृतिक उपनगर बांधण्याचा प्रस्ताव आहे. हे मंदिर ३६० फूट लांब, २३५ फूट रुंद आणि १६१ फूट उंच आहे.

मंदिरात आठ ते दहा फूट व्यासाचे आणि १४ ते १६ फूट उंचीचे चारशेहून अधिक खांब वापरण्यात येणार आहेत. १६१ फूट उंच मुख्य शिखराशिवाय चार उपशिखर असतील. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट २०२० रोजी राम मंदिराची पायाभरणी केली.

तेव्हापासून रामलल्लाच्या मंदिराचे मूर्त स्वरूप सुरू झाले आहे. २०२३मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, त्यानंतर दर्शनासह दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू राहणार आहे. मंदिराचे पूर्ण स्वरूप २०२५पर्यंत उभारले जाईल.

Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra Trust releases 3D preview of the grand Ram Mandir in Ayodhya

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात