प्रा.वामन केंद्रे यांना राष्ट्रीय कालीदास सन्मान प्रदान


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : मध्य प्रदेश शासनाच्या वतीने दिला जाणारा देशपातळीवरील सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठीत समजला जाणारा राष्ट्रीय कालीदास सन्मान २०२० या वर्षासाठी प्रा. वामन केंद्रे यांना जाहीर झाला होता त्याचा पुरस्कार प्रदान सोहळा भारत भवन भोपाळ येथे मोठ्या दिमाखात पार पडला. Awarding National Kalidas Award to Prof. Vaman Kendra

मध्य प्रदेश सरकारच्या वतीने हा पुरस्कार राज्याच्या संस्कृती मंत्री उषा ठाकुर यांच्या हस्ते व प्रधान संस्कृती सचिव शिव शेखर शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रुपये, मानपत्र शाल श्रीफळ आणि मंच सन्मान असे आहे.

हा पुरस्कार केंद्रे यांना त्यांच्या भारतीय रंगभूमीवरील अद्वितीय योगदानाबद्दल घोषित करण्यात आला होता. प्रा. केंद्रे यांनी भारतीय रंगभूमीचा ध्वज विश्वाच्या रंगमंचावर फडकावून तिला मानाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे योगदान दिले आहे. भारताने त्यांच्या नेतृत्वाखाली भरवलेले ८ वे थिएटर ॲालंपिक्स हे त्याचे एक ठोस उदाहरण होय.

झुलवा, एक झुंज वाऱ्याशी, दुसरा सामना, नातीगोती, तीन पैशाचा तमाशा,राहीले दूर घर माझे, गधे की बारात, सैंय्यॅां भए केोतवाल, टेम्ट मी नॅाट, लडी नजरिया, चार दिवस प्रेमाचे, रणांगण, ती फुलराणी, प्रेमपत्र, मध्यम व्यायोग, वेधपश्य , मोहे पिया, मोहनदास, गजब तेरी अदा, लागी लगन,काळा वजीर पांढरा राजा ही त्यांची अत्यंत गाजलेली नाटके होत.

Awarding National Kalidas Award to Prof. Vaman Kendra

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था