भाजपच्या साडेतीन नेत्यांना तुरुंगात घडण्याची राऊतांची भाषा; प्रत्यक्षात मंत्री बच्चू कडू, खासदार राजेंद्र गावितांनाही तुरुंगवासाची शिक्षा!!


प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे भाजप साडेतीन नेत्यांना तुरुंगात घालण्याची भाषा करत असताना प्रत्यक्षात महाविकास आघाडी मधील मंत्री बच्चू कडू आणि त्यांच्या पाठोपाठ पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनाच न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यामुळे हे दोन नेते गजाआड जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.Raut’s language about imprisoning three and a half BJP leaders

ठाकरे – पवार सरकारमधील शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना अलीकडेच निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याने न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. त्यानंतर आता शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना सुद्धा पालघर जिल्हा न्यायालयाने 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लवकरच भाजपच्या साडेतीन नेत्यांना तुरुंगात धाडण्याचे विधान केले खरे आता लगेच शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना न्यायालयाने शिक्षा दिल्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

खासदार राजेंद्र गावित यांनी जमिनीच्या व्यवहारातून चिराग किर्ती बाफना यांना 1.5 कोटी रुपयांचे धनादेश दिले. मात्र हे धनादेश वटले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर बाफना यांनी चेक बाऊन्सची पालघर जिल्हा न्यायालयात तक्रार केली होती. त्यानंतर आता पालघर जिल्हा न्यायालयाने गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटी 75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

बच्चू कडूंनाही शिक्षा

राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी यासंदर्भात 2017 मध्ये तक्रार दाखल केली होती. बच्चू कडू यांनी मुंबईत 42 लाख 46 हजार रुपये किंमतीचा स्वतःच्या मालकीचा फ्लॅट असतानाही 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी या फ्लॅटबद्दलची माहिती निवडणूक आयोगाला दिली नाही. या प्रकरणी न्यायालयाने बच्चू कडू यांना 25 हजार रुपये दंड, तसेच 2 महिने सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

संजय राऊत म्हणाले…

‘हमने बहुत बरदाश्त किया है…तो बरबाद भी हम ही करेंगे, असं म्हणत राऊतांनी भाजपाचे साडेतीन नेते, अनिल देशमुख असलेल्या तुरुंगात असतील आणि देशमुख बाहेर असतील, असं म्हणत मोठा गौप्यस्फोट केला. त्यामुळे आता भाजपाचे ते साडेतीन नेते कोण आहेत? याचा शोध सुरू झाला आहे.

Raut’s language about imprisoning three and a half BJP leaders

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था