Sanjay Raut Press : अमृता फडणवीसांनी उडवली खिल्ली; संजय राऊतांना म्हणाल्या “बिल्ली”!! नितेश राणे म्हणाले- लोंबत्या राऊत!

Sanjay Raut Press Today again a cat has tried to roar Amrita Fadnavis targets Raut, Nitesh Rane said Lombatya Raut

Sanjay Raut Press :  बहोत बर्दाश्त किया अब बर्बाद भी हम ही करेंगे असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांची स्फोटक पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला. केंद्रीय एजन्सी ईडीचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला. संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रावर आणि मराठी माणसांवर आक्रमणे होत आहेत. त्यासाठी कुणाला तरी युद्धाचा शंख फुंकावा लागला. तुम्ही पाप केले नसेल तर कोणाला घाबरण्याची गरज नाही, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. तुम्ही कितीही दबाव आणलात तरी आम्ही घाबरणार नाही. यावर आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. Sanjay Raut Press Today again a cat has tried to roar Amrita Fadnavis targets Raut, Nitesh Rane said Lombatya Raut


प्रतिनिधी

मुंबई : बहोत बर्दाश्त किया अब बर्बाद भी हम ही करेंगे असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांची स्फोटक पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला. केंद्रीय एजन्सी ईडीचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला. संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रावर आणि मराठी माणसांवर आक्रमणे होत आहेत. त्यासाठी कुणाला तरी युद्धाचा शंख फुंकावा लागला. तुम्ही पाप केले नसेल तर कोणाला घाबरण्याची गरज नाही, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. तुम्ही कितीही दबाव आणलात तरी आम्ही घाबरणार नाही. यावर आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

संजय राऊतांच्या पिक्चरचा ट्रेलरच फ्लॉप… : प्रवीण दरेकर

भाजप नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, शिवसेनेची करंगळी तुम्ही सोडलीत किंवा आम्ही सोडली तरी त्यानंतर सर्वाधिक मोठा पक्ष भाजपाच झाला. परंतु आपण सर्वात शेवटच्या क्रमांकावर गेलेलो आहोत, याची जाणीव मात्र त्यांना होत नाही, तेव्हा याचे जरा त्यांनी आत्मपरीक्षण करावे. आणि मग कुणाची वाढ झाली अन् कुणाची खुंटली, शिवसेनेची करंगळी तुम्ही सोडलीत किंवा आम्ही सोडली तरी त्यानंतर सर्वाधिक मोठा पक्ष भाजपाच झाला. परंतु आपण सर्वात शेवटच्या क्रमांकावर गेलेलो आहोत, याची जाणीव मात्र त्यांना होत नाही, तेव्हा याचे जरा त्यांनी आत्मपरीक्षण करावे. आणि मग कुणाची वाढ झाली अन् कुणाची खुंटली.

दरेकर पुढे म्हणाले की, भाजपाचा कुठलाही नेता अशा प्रकारच्या धमक्यांना भीक घालत नाही. ‘ज्याला कर नाही त्याला डर कशाला?’ राऊतांचा हा बारदेखील नक्कीच फुसका बार ठरेल. पत्रकार परिषद झाल्यावर हे सर्वांच्या लक्षात येईलच. दिवा जळताना जसा फडफडतो तशा प्रकारची फडफड राऊतांची होत आहे.
आजपर्यंत मीडियाच्या माध्यमातून टीका करत आक्रमकपणे स्वत:चं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या संजय राऊतांना आज मात्र कुठल्याही ठिकाणी शिवसेनेचे समर्थन मिळाले नाही, त्यामुळे ते पूर्णत: एकाकी पडले आहेत आणि याच हतबलतेतून ते शिवसेनेचे कवच घेऊन एक इवेंट करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ते पुढे म्हणाले की, गेल्या २-२.५ वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राने बरेच काही सोसले आहे. शेतकरी, कामगार, व्यवसायिक बरबाद झाले आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत. महाराष्ट्र अधोगतीच्या दिशेने जात आहे तेव्हा केवळ राजकीय अभिनिवेशातून “मी याला बरबाद करतो, त्याची वाट लावतो” असे म्हणण्यापेक्षा त्या बरबाद होत असलेल्या महाराष्ट्राकडे आधी लक्ष द्या, जनतेची नैतिक जबाबदारी प्रथम घ्या. मग आम्हांला काय बरबाद करायचे असेल ते करा. उसणं अवसान आणण्याचा राऊतांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. गेली २-४ दिवस त्यांची निराशाजनक अवस्था आपण पाहत आहोत, यांतून शेवटचा उपाय म्हणून अशाप्रकारचा आक्रस्ताळेपणा करायचा, शक्तीप्रदर्शन करायचे, कारण नसताना पक्षाला वेठीस धरायचे. आतापर्यंत ते संजय राऊत म्हणून बोलत होते परंतु आता त्यांना शिवसेना म्हणून बोलण्याची गरज भासत आहे आणि त्यामुळे स्वत:च्या बचावासाठी पक्षाला वेठीस धरण्याची भूमिका घेताना ते दिसत आहे.

आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है!

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यासंदर्भात सूचक ट्वीट केलं आहे. आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है! असे ट्विट करत संजय राऊतांचे नाव न घेता अमृता फडणवीस यांनी निशाणा साधला.

दुसरीकडे, भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया देत पलटवार केला आहे. संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडले आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात अपशब्द वापरले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा. ही पत्रकार परिषद म्हणजे निव्वळ ड्रामा आहे. सरकारमध्ये स्थान नसल्यानं संजय राऊत विचलित आहेत. संजय राऊत यांची ही पत्रकार परिषद फेल गेली आहे. खोदा पहाड, निकला चुहा, अशी पत्रकार परिषद झाल्याची टीका प्रसाद लाड यांनी केली.

दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनीदेखील ट्वीट करत जहाल टीका केली आहे. चाटायचं असेल तेव्हा .. पवार साहेब!! चावायचं असेल तेव्हा.. बाळासाहेब !! याला म्हणतात.. लोंबत्या राऊत!!, अशी भाषा नितेश राणे यांनी ट्विटमध्ये वापरली आहे.

हम डरेंगे नहीं, हम झुकेंगे नही, आपको झुकाएंगे, असा इशारा देत संजय राऊत यांनी तपास यंत्रणा आणि भाजपला थेट आव्हान दिलं आहे. तसेच उद्यापासून तुम्हाला अनेक गोष्टी समजतील, असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला महापौर किशोरी पेडणेकर, आनंद अडसूळ, अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, दादा भुसे, दिवाकर रावते, उदय सामंत, प्रियंका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, सचिन अहिर, आदेश बांदेकर, मनीषा कायदे, गजानन कीर्तिकर, संजय शिरसाट यांच्यासह अनेक शिवसेना खासदार, नेते आणि उपनेते उपस्थित होते. त्याशिवाय शिवसेना भवनाबाहेर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Sanjay Raut Press Today again a cat has tried to roar Amrita Fadnavis targets Raut, Nitesh Rane said Lombatya Raut

संबंधित बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण