संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतला गर्भित इशारा; पवार परिवारावर छापे घातलेत, पण ठाकरे परिवारावर घालाल तर बघा!!


शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या बहुचर्चित तथाकथित स्फोटक पत्रकार परिषदेतून भाजपच्या साडेतीन नेत्यांची नावे जरी बाहेर आली नसली, तरी एक गर्भित इशारा मात्र नक्कीच बाहेर आला आहे, तो म्हणजे पवार परिवारावर छापे घातले पण ठाकरे परिवारावर छापे घालाल तर बघा!! हा तो गर्भित इशारा आहे.Implicit warning to Sanjay Raut’s press conference

संजय राऊत यांनी आपल्या संपूर्ण पत्रकार परिषदेचे कॉन्सन्ट्रेशन आपल्यामागे शिवसेना कशी उभी आहे?, हेच सांगण्यावर ठेवले होते. त्याच वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या परिवारावर ईडी आणि केंद्रीय तपास संस्थांनी छापे कसे घातले, आठ दिवस ते पवार परिवाराच्या घरांमध्ये कसे बसून होते, याचे वर्णन केले आणि त्यानंतर त्यांनी आपला मोहरा ठाकरे परिवाराकडे वळवला.


Sanjay raut : संजय राऊत यांच्याविरुद्ध दिल्लीत गुन्हा दाखल; दिप्ती रावत यांनी दिली तक्रार


गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे परिवाराला धमक्या देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 19 बंगले आहेत. श्रीधर पाटणकरांनी देवस्थानच्या जमिनी घेतल्या आहेत वगैरे आरोप ठाकरे परिवारावर करण्यात येत आहेत. प्रत्यक्षात आम्हाला उद्धव ठाकरे यांचे 19 बंगले दाखवा. तेथे पत्रकारांची पिकनिक नेतो, असे संजय राऊत म्हणाले. श्रीधर पाटणकरांनी थेट देवस्थान कडून जमीन घेतलेली नाही, तर मध्ये 12 लोक आहेत आणि या जमिनीची खरेदी व्यवहार या 12 लोकांनी त्यांनी केल्यानंतर श्रीधर पाटणकरांनी ती जमीन खरेदी केली आहे, असे संजय राऊत म्हणाले. या सगळ्याचा गर्भितार्थ हाच होता की ईडी सारख्या केंद्रीय तपास संस्थेने पवार परिवारावर जरी जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी घोटाळ्या संदर्भात छापे घातले असले पवारांच्या बहिणींना चौकशी आणि तपासासाठी बोलवले असले, तरी ठाकरे परिवारा पर्यंत केंद्रीय तपास यंत्रणा पोहोचू नयेत, असाच गर्भित इशारा संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेनिमित्त दिला.

याचा नेमका परिणाम केंद्रीय तपास संस्थांवर काय होईल हा भाग जरी आलेला असला तरी संजय राऊत यांनी एक प्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच यानिमित्ताने राजकीय बचाव केल्याचे दिसून येत आहे. संजय राऊत यांची भाषा आक्रमक होती, पण बचावाचा सर्वोत्तम मार्ग आक्रमण हाच असतो ही जर युद्धनीती लक्षात घेतली तर या पत्रकार परिषदेतले खरे इंगित समोर येते.

भले संजय राऊत यांनी भाजपच्या साडेतीन नेत्यांना तुरुंगात घडणार अशी भाषा वापरून वातावरण निर्मिती केली. परंतु, अख्ख्या पत्रकार परिषदेत त्यांनी साडेतीन नेत्यांची नावे घेतलीच नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कोणता भ्रष्टाचार झाला, या विषयी ते बोलले. नावे घेताना नील किरीट सोमय्या, किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांची नावे त्यांनी भ्रष्टाचार करणारे म्हणून घेतली. हे सर्व करताना “आक्रमण हाच उत्तम बचाव”, या धोरणानुसार यांनी ठाकरे परिवाराची बाजू अप्रत्यक्षपणे उचलून धरल्याचे दिसून आले.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेचे राणा भीमदेवी थाटात वर्णन करणारी मराठी माध्यमे हे इंगित सांगणार नाहीत. पण त्यामुळे पत्रकार परिषदेचे मागचे सत्य मात्र दडून राहत नाही हे या निमित्ताने सांगावे लागत आहे.

Implicit warning to Sanjay Raut’s press conference

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात