अस्मिता और सन्मान में अश्विनी कुमार “काँग्रेस के बाहर” मैदान में!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वकर्मा यांनी राहुल गांधी नेमके कोणत्या पित्याचे पुत्र आहेत?, असा वादग्रस्त सवाल केल्यानंतर राहुल गांधींची बाजू परवाच उचलून धरणार काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कायदेमंत्री अश्विनी कुमार यांनी आज सकाळी अचानक काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. अस्मिता आणि सन्मान यासाठी मी राजीनामा देऊन बाहेर पडत आहे, अशा आशयाचे पत्र अश्विनी कुमार यांनी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिले आहे.Asmita and Sanman in honor of Ashwini Kumar “Outside the Congress”

काँग्रेस मधून बाहेर पडताना अश्‍विनीकुमार यांनी “अस्मिता और सन्मान में काँग्रेस के बाहर मैदान में”, अशी घोषणा दिली आहे. मी ज्या काँग्रेस पक्षात वाढलो तो काँग्रेस पक्ष आता उरलेला नाही. पक्षाचे अनेक वरिष्ठ आणि निष्ठावंत नेते पक्षाबाहेर पडत आहेत. त्यांना पक्षाबाहेर का पडावे लागत आहे?, याचे चिंतन काँग्रेस हायकमांडने करावे, अशी सूचना अश्विनी कुमार यांनी केली आहे. काँग्रेस बाहेर पडलो असलो तरी राजकारणातून बाहेर गेलेलो नाही. येत्या काही दिवसात मी पुढची राजकीय वाटचाल जाहीर करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसचे तरुण नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान यापूर्वीच काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यानंतर केंद्रात मंत्री राहिलेल्या अश्विनीकुमार यांनी काँग्रेसला रामराम केला आहे.

अश्विनी कुमार यांनी दोनच दिवसांपूर्वी आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची बाजू उचलून धरली होती. मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या एखाद्या व्यक्तीने या पद्धतीचे विधान करू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. मात्र दोनच दिवसांनंतर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे.

Asmita and Sanman in honor of Ashwini Kumar “Outside the Congress”

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात