पिंपरी : ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना ठराविक वेळेसाठी बंदी ; पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिले आदेश


  • पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कासरसाई येथे श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना आहे. Pimpri: Vehicles transporting sugarcane banned for a certain period of time; Order issued by Deputy Commissioner of Police Anand Bhoite

विशेष प्रतिनिधी

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये उसाच्या ट्रॉलींना अपघातही झाले आहेत. परिणामी वाहतुकीस अडथळा होऊन कोंडी होते.या पार्श्‍वभूमीवर पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी पिंपरी -शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना ठराविक वेळेसाठी बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कासरसाई येथे श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना आहे.त्यामुळे शहरातून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची नेहमी वर्दळ असते.तसेच या वाहनांमध्ये उसाचे जास्त वजन असल्याने तसेच, ट्रॅक्‍टरला एकापेक्षा जास्त ट्रॉली जोडल्याने ही वाहने सावकाश धावतात.त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.



ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत वाहतुक बंद राहणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते सायंकाळी ५ पर्यंत शहरातून ऊस वाहतुक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंत ऊस वाहतूक करू शकतात.

Pimpri : Vehicles transporting sugarcane banned for a certain period of time; Order issued by Deputy Commissioner of Police Anand Bhoite

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात