‘ही तर सरकार प्रेरित हत्या ! या खुनी सरकारवरच कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा’ ; चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाना साधला


२०१९ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेचा निकाल १९ जून २०२० रोजी लागला. ‘This is a government-inspired assassination! A case under section 302 should be filed against this murderous government ‘; Chitra Wagh targeted the state government


विशेष प्रतिनिधी

मुंबई  : २०१९ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेचा निकाल १९ जून २०२० रोजी लागला. त्यानंतर १ वर्षे उलटूनही मुलाखती घेतल्या नाही,दरम्यान या नैराश्यातून एका विद्यार्थ्याने पुण्यातील फुरसंगी येथे गळफास लाऊन आत्महत्या केली होती.

मात्र आत्महत्येला सहा महिने उलटले असून नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यादीत त्याचे नाव आले आहे. स्वप्नील लोणकर असे या तरुणाचे नाव आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यानयावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाना साधला आहे.



याबाबत चित्रा वाघ ट्विट करत म्हणाल्या, ‘ही तर सरकार प्रेरित हत्या ! MPSC परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नव्हती.या नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरचं ६ महिन्यानंतर मुलाखतीच्या यादीत नाव आलंय.दरम्यान प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराचा स्वप्नील बळी ठरल्याचं खुद्द सरकारनं कबूल केलं. या खुनी सरकारवरच कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा.’ असा निशाणा चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर साधला आहे.

This is a government-inspired assassination! A case under section 302 should be filed against this murderous government ‘; Chitra Wagh targeted the state government

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात