विशेष प्रतिनिधी
मुंबई : चंदनाच्या झाडांची चोरी अशा बातम्या अधून मधून वाचायला मिळतात. मात्र आगामी काळात या बातम्या इतिहासजमा होण्याच शक्यता आहे. कारण महाराष्ट्र सरकारने चंदन झाड तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी काढावी लागणार नाही. राज्यात सध्या केवळ फक्त तीन हजार चंदनाची झाडे शिल्लक राहिलेली आहेत. त्यातील ६१४ हेक्टर जंगल हे अमरावती आणि यवतमाळ वनवृत्तात आहे. Now cut the sandalwood tree without hesitation, no permission required
जागतिक बाजारात चंदनाची मागणी सातत्याने वाढत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातही चंदनाने मूळ धरले आहे. विशेषत: महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ अन्वये चंदनाचे झाड तोडण्यास बंदी होती. राज्य सरकारने ही बंदी आता मागे घेतली आहे.
त्यामुळे आता चंदनाची लागवड मोठ्या प्रमाणात होण्यास प्रोत्साहन मिळणार असून झाड तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी लागणार नाही. शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या झाडाला वन विभागाच्या संरक्षणामधील झाड म्हणून वगळले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातही चंदनाने मूळ धरले आहे. १ टन चंदन लाकडापासून कमीत कमी ८ लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. लघू, मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी चंदनाचे झाड तोडण्यावर असलेली बंदी उठविण्याची विनंती करणारे पत्र केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App