भाजपसाठी ‘नो मनी पॉवर’ ओन्ली ‘मॅन पॉवर’ : कालिता माझी आणि चंदना बावरी यांचा लढा म्हणजे बंगालमधील लोकशाहीचा विजय!

  • राजकारणाची आणि निवडणुकांची चर्चा सुरू होताच मनी पॉवर आणि ताकद यांची चर्चा सुरू होते. राजकीय पक्ष सामान्य लोकांना तिकीट देत नाहीत, असा समजही आहेच. पण, तुम्ही पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नशिब अजमावणार्या भाजपच्या उमेदवार कलिता माझी आणि चंदना बावरींकडे बघितल्यावर सर्व गैरसमज दूर होतील. यावरून भारताची लोकशाही किती मजबूत आहे हे दिसून येते.
  • या दोन उमेदवारांना भाजपने दिलेले तिकीट म्हणजे लोकशाहीचा सन्मान …

विशेष प्रतिनिधी

कोलकाता: एकेकाळी इतरांच्या घरात काम करणार्‍या कलिता माझी यांना पश्चिम बंगाल निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. पूर्व बर्दवानच्या आशाग्राम येथून भाजपने कलिता माझी यांना तिकीट दिले आहे. कालिता यांचे पती प्लंबर म्हणून काम करतात. कलिता आर्थिक अडचणींमुळे जास्त अभ्यास करू शकल्या  नाहीत.या उमेदवारांना पाहिल्यावर भाजपसाठी ‘नो मनी पॉवर’ ओन्ली ‘मॅन पॉवर’भाजपसाठी ‘नो मनी पॉवर’ ओन्ली ‘मॅन पॉवर’ हे वाक्य सत्य ठरते .No money power for BJP, only man power: The fight between Kalita Mazhi and Chandana Bawri is a victory for democracy in Bengal!कालिता माझी यांच्या उमेदवारीमुळे भाजप कार्यकर्तेही खूप खूश आहेत. राष्ट्रीय भाजपा सरचिटणीस बी.एल संतोष यांनी ट्विट करून कालिताचे अभिनंदन केले. त्यांनी लिहिले आहे, “ह्या श्रीमती कलिता माझी आहेत. आशाग्राममधील भाजप उमेदवार. त्या घरगुती मदतीची कामे करतात आणि त्यांचा नवरा प्लंबर आहे. त्या एक सक्रिय कार्यकर्ता असून त्यांनी पंचायत निवडणुक लढवली आहे.भाजप नेहमीच प्रतिभा आणि कष्ट यांना ओळखते. शुभेच्छा. “


कालिताला पार्थ माझी नावाचा मुलगा असून तो आठवीत शिकतो. कलिताचे माहेर काश्मनगर, मंगकोट येथे आहे. त्यांच्या कुटुंबात7 बहिणी आणि एक भाऊ आहे. त्यांचे वडील मजूर होते, त्यांचे निधन झाले आहे.

कालिता माझी आणि चंदना बावरी यांचा लढा म्हणजे बंगालमधील लोकशाहीचा विजय!

No money power for BJP, only man power: The fight between Kalita Mazhi and Chandana Bawri is a victory for democracy in Bengal!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*