वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारच्या लस निर्यात करण्याच्या धोरणावर सडकून टीका केली असून आधी भारतातील लसीकरण पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे. नंतरच इतर देशांना लस निर्यात करावी असे आग्रही मत नोंदविले आहे. Sonia Gandhi target BJP led govt.
राज्यातील लस तसेच औषधे, व्हेंटिलेटरची उपलब्धता यांचा आढावा सोनिया यांनी घेतला. कोरोनाच्या चाचण्या, रुग्णांवर उपचार आणि लसीकरणावर राज्यांनी भर द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
राहुल गांधी म्हणाले, ‘‘कोरोनाचा बदललेल्या विषाणूकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, कारण त्यामुळेच दुसरी लाट आली आहे. कोरोनामुळे गरिबांना मोठा फटका बसला आहे. त्यांना केंद्र सरकारने मदत केली पाहिजे.’’
महाराष्ट्र, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, पंजाब, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये लशींचा तुटवडा आहे. कोरोनाची स्थिती मोदी सरकारला हाताळता आलेली नाही. कोरोना लशींची निर्यात करून देशात मात्र तुटवडा निर्माण करण्यात आला आहे.’’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App