आमने-सामने : भुजबळ म्हणतात ‘रेमडिसिव्हिर घरी तयार होत नाही’ तर दरेकर म्हणतात ‘अहो लोकप्रतिनिधी हे असं वक्तव्य शोभत नाही’


विशेष प्रतिनिधी

मुंबई: कोरोना लस पुरवठा- लॉकडाउन या सर्व मुद्द्यांवर सध्या जोरदार खडाजंगी महाराष्ट्रात सुरू आहे.कोरोनाच्या या संकटात भर म्हणून रेमडिसिव्हिर औषधाचा तुटवडा ही सध्या राज्यातील जनतेसाठी आणि सरकारसाठी चिंतेची बाब आहे.chhagan Bhujbal says Remedies are not made at home while pravin Darekar says people’s representative such a statement is not appropriate

काही ठिकाणी रेमडिसिव्हिरचा काळाबाजार सुरू आहे तर नाशिकमध्ये मात्र हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने सामान्य जनता परेशान झाली आहे.या मुद्द्यावर राज्याचे मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी, ‘रेमडिसिव्हिर घरी तयार होत नाही’, असं वक्तव्य केलं.त्यांच्या या वक्तव्याचा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चांगलाच समाचार घेतला.”सध्या तुटवडा आहे. माझ्या घरात तर औषध नाहीत. कलेक्टरच्या घरीदेखील औषधं नाहीत.

जर कोणी मला सांगितलं की या दुकानात साठा करण्यात आलाय तर मी स्वत: जाइन आणि तो साठा गरजूंसाठी उपलब्ध करून देईन. सुरूवातीच्या काळात रेमडेसिव्हिरचा साठा उधळला गेला.

त्यामुळे आता त्याचा तुटवडा आहे. त्याला कोण काय करणार? मी माझ्या घरी ते औषध बनवत नाही”, असं विधान नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलं.

यावरून प्रविण दरेकर म्हणाले, “छगन भुजबळ यांनी रेमडीसीवर आमच्या घरात तयार होत नाही असे म्हणणे म्हणजे सरकार या व्यवस्थेत हतबल असल्याचा एकाअर्थी पुरावाच आहे.

अशा प्रकारची वक्तव्ये करणं म्हणजे सरकारने आपल्या कर्तव्यापासून आणि जबाबदारीपासून दूर जाणं असं होतं.छगन भुजबळ हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी असे वक्तव्य करणं योग्य नाही.

जेव्हा आपातकालीन स्थिती असते, तेव्हा राज्याची जनता घाबरलेली असते. त्या जनतेला समजावून सांगणं आणि त्यांच्या रोषाला शांतपणे सामोरं जाणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. त्यामुळे भुजबळांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो”

chhagan Bhujbal says Remedies are not made at home while pravin Darekar says people’s representative such a statement is not appropriate

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात