महाराष्ट्रासाठी येत्या दोन – तीन दिवसांत ११२१ व्हेंटिलेटर येणार; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती


प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्रासाठी येत्या दोन ते तीन दिवसांत 1121 व्हेंटिलेटर येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात दिली आहे. ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सहाय्य करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.1121 ventilators for Maharashtra in next two-three days; Information of Union Minister Prakash Javadekar

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जे उपाय योजले जात आहेत त्याचे आपण पालन केले पाहिजे. पुणेकर नागरिकांनी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. हा कालावधी कोरोना संसर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठीची बंधने पाळली जावीत, अ‍से मत  जावडेकर यांनी व्यक्त केले.विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली.

जावडेकर म्हणाले की, महाराष्ट्रासाठी व्हेंटिलेटर मिळण्याबाबत आपण केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांशी, मंत्र्यांशी  बोलणे केले असून 1121 व्हेंटिलेटर येत्या तीन ते चार दिवसात येतील .

तसेच ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सहाय्य करणार आहे असे त्यांनी सांगितले. कोरोना रुग्णांचे ट्रॅकिंग, टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करण्यासाठी जे मनुष्यबळ लागणारआहे त्यासाठी नॅशनल हेल्थ मिशन मधून निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्यासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्वाचे असून प्रत्येकाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे सांगतानाच ट्रॅकिंग, टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करा. बेड व्यवस्थापन तसेच रेमडेसिवरबाबत कडक धोरण राबवा,

असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. आरोग्य सुविधा वाढविण्यासोबतच हॉटस्पॉटमधील बंधने पाळली जातील याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

1121 ventilators for Maharashtra in next two-three days; Information of Union Minister Prakash Javadekar

हे ही वाचा

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*