महाराष्ट्रात कोरोना लशीचे तब्बल ५६ टक्के डोस वापराविना पडून, प्रकाश जावडेकर यांची राज्य सरकारवर टीका


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – केंद्र सरकारडून महाराष्ट्राला लसीकरणासाठी आतापर्यंत तब्बल ५४ लाख डोस दिले वितरित करण्यात आले आहेत. मात्र त्यापैकी केवळ २३ लाख डोसच बारा मार्चपर्यंत वापरण्यात आले. आता शिवसेनेचे खासदार जादा डोसची विनंती करीत आहेत. महाराष्ट्र सरकारने आधी कोरोनाची हातळणी नीट केली नाही आता लसीकरणाचे वितरणही ढिसाळ पद्धतीने केले जात असल्याची टीका केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. Prakash Jawadekar lashes on Maharashtra govt. for poor vaccinationजावडेकर यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात, महाराष्ट्राला लसीकरणासाठी दिलेल्या डोसपैकी ५६ टक्के डोस अजून वापराविना पडून आहेत. लसीकरणासाठी आतापर्यंत ५४ लाख डोस दिले आहेत. मात्र त्यापैकी केवळ २३ लाख डोसच वापरले आहेत. लसीकरणाबाबात राज्य सरकार किती गंभीर आहे हे यावरून सहज लक्षात येते. राज्यात लसीकरणाची व्यवस्था योग्य प्रकारे राबविली जात नाही हेच यावरून स्पष्ट होते.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून लसीकरण हाच त्याला आळा घालण्याचा उपाय असल्याचे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्राला जादा डोसेस देण्याची मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना समक्ष भेटून केली होती. त्या पार्श्वभूमीवर जावडेकर यांच्या प्रतिक्रियेला महत्व आहे.

Prakash Jawadekar lashes on Maharashtra govt. for poor vaccination

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती