महेश मांजरेकर यांना अभय; उच्च न्यायालयाकडून अटकेसारखी कारवाई न करण्याचे पोलिसांना निर्देश


वृत्तसंस्था

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी झालेल्या सुनावणीत चित्रपट निर्माते महेश मांजरेकर आणि दोन निर्मात्यांवर तीन आठवड्यांपर्यंत अटकेसारखी कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश शहर पोलिसांना दिले आहेत. Mumbai High Court grants relief to Mahesh Manjrekar, Accused of filming pornographic scenes on minors

‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटामुळे ते अडचणीत आले आहेत. चित्रपटात अल्पवयीन मुलांवर अश्लील दृश्ये चित्रित केल्याप्रकरणी चित्रपट निर्माते महेश मांजरेकर आणि दोन निर्मात्यांविरुद्ध तीन आठवड्यांसाठी अटकेसारखी कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शहर पोलिसांना दिले.शहर पोलिसांनी या आठवड्याच्या सुरुवातीला मांजरेकर आणि इतरांविरुद्ध मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक मांजरेकर आणि निर्माते नरेंद्र हिरावत आणि श्रेयांश हिरावत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी अटकेपासून अंतरिम संरक्षणही मागितले.

Mumbai High Court grants relief to Mahesh Manjrekar, Accused of filming pornographic scenes on minors

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण