नागपूर बनले सिटी ऑफ जॉय ;महिन्यात हत्येचा एकही गुन्हा दाखल नाही; पोलिस आयुक्तांनी मानले नागपूरकरांचे आभार


विशेष प्रतिनिधी

नागपूर : नागपूरकरांसाठी सकारात्मक बातमी तर पोलिसांसाठी दिलासा देणारी बातमी ..हत्येच्या घटनांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या उपराजधानीत गेल्या महिनाभरात हत्येचा एकही गुन्हा दाखल नाही. पोलिस आयुक्तांनी मानले नागपूरकरांचे आभार मानले आहेत. Nagpur became the City of Joy , No homicide charges were filed in the month; The Commissioner of Police thanked Nagpurkar

नागपूर शहर हे क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीत शहर असलेलं नागपूर हत्यांसाठी कुप्रसिद्ध होत. गेल्यावर्षी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB)आकड्यांनुसार  देशात सर्वाधिक हत्या होणाऱ्या शहरांच्या यादीत नागपूरचे नाव आघाडीवर होते. याच नागपूर शहरात फेब्रुवारी महिन्यात एक सुद्धा हत्येचा गुन्हा दाखल झालेला नाही. ही नागपूरकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.

नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी  ही माहिती दिली आहे..गेल्या काही महिन्यांमध्ये नागपुर शहरात  अनेक मोठी हत्याकांड घडली ज्याने नागपूर पोलिसांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर सुद्धा प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु फेब्रुवारी महिना नागपूरकरांसाठी आणि नागपूर पोलिसांसाठी दिलासा देणारा ठरला कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच नागपूर शहरात संपूर्ण महिन्याभरात हत्येचा एकही गुन्हा दाखल झालेला आहे.महिनाभऱ्यात एक ही हत्या न होण्यामागे नागपूर पोलिसांचे विशेष प्रयत्न आणि राबविण्यात येत असलेले वेगवेगळे ऑपरेशन आहे ..
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील पाचही झोनच्या डीसीपी, गुन्हे शाखेला त्यांच्या हद्दीतील गुन्हेगारी व्यक्तींवर नजर ठेवण्याचे आदेश दिले. नागपूर पोलिसांनी फूट पेट्रोलिंग, बिट मार्शल सक्षमीकरण, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेचे टीम तैनात करून गुन्हेगार वर आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले..दामिनी पथक मार्फत महिला सुरक्षेवर भर देण्यात आला..

सामान्य जनतेच्या विश्वास संपादन करण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे सामान्य नागपूरकरांच्या सहकार्याने हे शक्य झाले.मात्र हे कायम राहून गुन्हेगारी नियंत्रणात आली तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.

अमितेशकुमार , पोलीस आयुक्त, नागपूर

Nagpur became the City of Joy , No homicide charges were filed in the month; The Commissioner of Police thanked Nagpurkar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण