भाजपमधून समाजवादी पक्षात गेलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्या ताफ्यावर दगडफेक


विशेष प्रतिनिधी

लखनौ : उत्तर प्रदेशमधील कुशीनगर जिल्ह्यात प्रचार करणारे माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत मौर्य यांच्या कारच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. मौर्य यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.Swami Prasad Maurya’s convoy from BJP to Samajwadi Party was stoned

हा हल्ला भाजपने घडवून आणल्याचा आरोप स्वामी प्रसाद मौर्य यांनी केला आहे. या घटनेमुळे कुशीनगर जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून भाजप विरुद्ध समाजवादी पार्टी यांच्यातील संघर्ष आणखी शिगेला पोहोचला आहे. स्वामी प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.राज्यातील विधानसभा निवडणूक सुरू होण्याआधी त्यांनी भाजपला रामराम ठोकून समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्याच रागातून भाजपकडून हा हल्ला करण्यात आला असावा, असा आरोप मौर्य यांनी केला आहे. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. दगडफेकीमुळे अनेक वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याचे मौर्य यांनी सांगितले. स्वामी प्रसाद मौर्य त्यांच्या समर्थकांच्या प्रचारासाठी जात असताना खलवा पट्टी गावात ही दगडफेकीची घटना घडली.

दगडफेकीच्या निषेधार्थ स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समर्थकांनी रास्ता रोको केला. यादरम्यान सपा उमेदवार स्वामी प्रसाद यांच्याशिवाय त्यांची मुलगी आणि भाजप खासदार संघमित्रा मौर्यही घटनास्थळी पोहोचले. भाजप खासदार संघमित्रा मौर्य यांनी त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. स्वामी प्रसाद हे कुशीनगरच्या फाजिलनगर मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत.

Swami Prasad Maurya’s convoy from BJP to Samajwadi Party was stoned

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण