महावितरणकडून विलासराव देशमुख अभय योजनेची घोषणा थकित रकमेत सवलत, पुन्हा वीज जोडणी देणारी नवी योजना


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद केलेल्या ग्राहकांकडे थकबाकीची रक्कम रुपये ९ हजार तीनशे चौपन्न कोटी आहे. कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद केलेल्या ग्राहकांसाठी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख, यांच्या नावाने अॅम्नेस्टी स्किम, Amnesty Scheme योजना राबविण्यात येत आहे. जेणेकरून महावितरणला अशा थकबाकीदार ग्राहकांकडून काही प्रमाणात वसुलीची रक्कम मिळेल. महावितरणची आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी हातभार लागेल. योजनेचा कालावधी १ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत राहील. Vilasrao Deshmukh Abhay Yojana Announcement from MSEDCL New scheme for re-connection of electricity, relief in arrears

उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या प्रशासनाला जानेवारी महिन्यात योजनेबाबत निर्देश दिले होते. महावितरणमध्ये जवळपास ३ कोटींच्या वर वीज ग्राहक असून यामध्ये उच्चदाब व लघुदाब ग्राहकांचा समावेश आहे. महावितरण सातत्याने ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी वेगवेगळे उपाय योजत असते. तसेच ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी प्रसंगी हप्त्याने रक्कम भरण्याची सवलतही देत असते. परंतु काही ग्राहक या सर्व उपाययोजनांना योग्य प्रतिसाद देत नाही, पर्यायी महावितरणला सर्व सोपस्कार पार पाडून अशा ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी बंद करावा लागतो. अशा जोडण्याना Permanently Disconnectedअर्थात ‘पीडी कनेक्शन’ म्हणूनही ओळखले जाते.



डिसेंबर-२०२१ अखेर थकबाकी पोटी कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद केलेल्या ग्राहकांची संख्या जवळपास ३२ लाख १६ हजार पाचशे असून थकबाकीची रक्कम (Franchisee area फ्रँचायजी विभाग –भिवंडी, मालेगाव आणि ठाणे वगळून) ७ हजार सातशे सोळा कोटी रुपये एवढी झालेली आहे. Franchisee area सहित कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद केलेल्या ग्राहकांकडे थकबाकीची रक्कम रुपये ९ हजार तीनशे चौपन्न कोटी एवढी आहे. यामध्ये मूळ रक्कम ६ हजार दोनशे एकसष्ट कोटी रुपये आहे.

अशा थकित रकमेची वसुली करणे हे खूप महाकठीण काम झाले आहे. महावितरणची आर्थिक परिस्थिती ढासळण्यासाठी ही कृषी पंप थकबाकीनंतर ही थकबाकीसुद्धा महत्वाचे कारण आहे. तसेच कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद केलेल्या ग्राहकांना थकबाकी रक्कमेमध्ये काही सवलत देऊन त्यांचा घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजपुरवठा सुरू करता येईल. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे बंद झालेले व्यवसाय, उद्योग पुन्हा चालू होतील व लाखो लोकांना रोजगार मिळेल व राज्याच्या अर्थकारणाला गती मिळेल.

राज्यातील ३२ लाख ग्राहकांना पुन्हा वीज जोडणी मिळविण्याची संधी प्राप्त होईल. प्रामुख्याने राज्यातील व्यावसायिक व औद्योगिक आस्थापने पुन्हा सुरू होऊन मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होईल यामुळे राज्याच्या अर्थकारणाला चालना मिळेल.

कायमस्वरूपी बंद केलेल्या ग्राहकांना व्याज व दंड रकमेत जवळपास १ हजार चारशे पंचेचाळीस कोटींची सूट मिळेल.ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू असेल. थकबाकीदार ग्राहकांनी मूळ रक्कम एकरकमी भरल्यास व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ होईल.थकबाकीदार ग्राहकांनी मुद्दलाची रक्कम एकरकमी भरणा केल्यास उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के व लघुदाब ग्राहकांना १०टक्के अधिकची सवलत थकीत मुद्दल रकमेत मिळेल.

Vilasrao Deshmukh Abhay Yojana Announcement from MSEDCL New scheme for re-connection of electricity, relief in arrears

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात