महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे मोठ्यासंख्येत; फडणवीस म्हणाले लवकरच कडक कायदा आणण्याचा विचार!


राज्यातील बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रमाण ९० ते ९५ टक्के आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात बेपत्ता व्यक्तींच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.  परिणामी राज्य सरकारकडून उपाययोजना संदर्भात पावलं उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना,  काही विशेष माहिती दिली आहे. Love Jihad cases in large numbers in Maharashtra Fadnavis said he will bring a strict law soon

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील बेपत्ता व्यक्तींच्या चौकशीदरम्यान लव्ह जिहादची प्रकरणं मोठ्या संख्येने आढळली आहेत. राज्यातील बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रमाण ९० ते ९५ टक्के आहे.

याशिवाय, देवेंद्र फडणवीस म्हणाले काही प्रकरणांमध्ये खोटी आश्वासने दिल्याचे, खोट्या ओळखींचा वापर केल्याचे समोर आले आहे. अशी प्रकरणेही समोर आली आहेत, ज्यामध्ये विवाहित व्यक्तीही ओळख बदलून महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. यामध्ये ‘लव्ह जिहाद’ म्हणून संबोधली जाणारी प्रकरणे देखील मोठ्या प्रमाणात पुढे आली आहेत. फडणवीस यांनी नमूद केले की, ते लव्ह जिहादवर कायदा आणण्याचा विचार करत आहेत. या संदर्भात सध्या अस्तित्वात असलेल्या विविध कायद्यांचा अभ्यासही केला जात आहे.

Love Jihad cases in large numbers in Maharashtra Fadnavis said he will bring a strict law soon

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात