अखेर रायगड जिल्ह्यातील लालपरी धावली

संपात सामील झालेल्या रायगड जिल्ह्यातील संपकरी कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी दुपारपासून टप्प्याटप्प्याने रुजू झाले आहेत.Finally, Lalpari from Raigad district ran away


विशेष प्रतिनिधी

रायगड : एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण करा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे.पण काल झालेल्या बैठकीत पगारवाढ झाल्याने बरेच एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.दरम्यान संपात सामील झालेल्या रायगड जिल्ह्यातील संपकरी कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी दुपारपासून टप्प्याटप्प्याने रुजू झाले आहेत.



एसटी बसेस आजपासून पुन्हा एकदा पेणच्या रस्त्यावर धावू लागल्या आहे. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील एसटी सुरू केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.रायगड जिल्ह्यातील पेण आगारातून पनवेल, नागोठणे, अलिबाग या ठिकाणच्या गाड्या सोडून प्रवाशांना सुखकर प्रवास देण्यास एसटी महामंडळाने पुन्हा एकदा एसटी सेवा सुरू केली.

यावेळी एसटी विभाग नियंत्रक अनघा बारटक्के म्हणाले की , आज रायगड जिल्ह्यातील आठ आगारांमधील विविध ठिकाणच्या बसेस सुरू झाल्या असून टप्प्याटप्प्याने जसे जसे कर्मचारी हजर होतील तसेतसे जिल्यातील आठही आगारांमधून बसेस सोडून प्रवाशांना जास्तीत जास्त बसेस उपलब्ध करून देणार आहे.

Finally, Lalpari from Raigad district ran away

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात