मुंबई : २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका प्रारूप प्रभागांच्या कच्चा आराखड्याच्या तपासणीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. Dates of formation of Zilla Parishad, Panchayat wards declared
रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग (८ फेब्रुवारी)
नाशिक,जळगाव, अहमदनगर (९ फेब्रुवारी)
पुणे,सातारा (१० फेब्रुवारी)
सांगली, सोलापूर, कोल्हापूर (११फेब्रुवारी)
औरंगाबाद,जालना,परभणी,हिंगोली,बीड,नांदेड,उस्मानाबाद,लातूर (१२फेब्रुवारी)
अमरावती,बुलढाणा,यवतमाळ (१३ फेब्रुवारी)
चंद्रपूर,वर्धा, गडचिरोली(१४फेब्रुवारी ) असा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
२५ जिल्हा परिषदा व २८४ पंचायत समित्यांची प्रारूप रचना तयार करण्यासाठी आयोगाच्या दि.२ फेब्रुवारीच्या पत्रान्वये सूचना देण्यात आल्या आहेत.
संबंधित कामकाज हाताळणारे उप जिल्हाधिकारी व संबंधित तहसिलदार यांनी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा घेऊन आयोगाच्या कार्यालयात सकाळी १०.३० वाजता उपस्थित रहावे. तसेच प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तपासणी करण्यासाठी हार्ड तसेच सॉफ्ट कापी (Excel Formatसह) तसेच नकाशे इ. कागदपत्रे आणावीत, असे राज्य निवडणूक आयुक्तांनी आजच्या आदेशात म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App