वृत्तसंस्था
नाशिक: नाशिक जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याच्या ३५ एकरातील उसाची आगीत राख झाली आहे. निफाड तालुक्यामध्ये शॉर्टसर्किटने भडका उडाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. Ashes of 35 acres of sugarcane in Nashik; Predict a short circuit in Niphad
जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील सिंगवे या गावात शेतक-याचा तब्बल ३५ एकरावरील उस जळून खाक झाला आहे. रामदास सानप असे शेतकऱ्याचे नाव आहे. महावितरणाच्या तारांचे शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे समजते. शॉर्टसर्किट झाल्याने आगीची ठिणगी उसात पडली.
उसाने पेट घेतला आणि अवघ्या काही मिनिटातच बघता बघता आख्खा उस जळून खाक झाला. यात शेतक-याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून शेतक-याला नुकसान भरपाई मिळायला हवी अशी मागणी गावक-यांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App