लतादीदींच्या आयुष्यातील मौलिक क्षण!!

विशेष प्रतिनिधी

लतादीदींच्या निधनानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांच्याविषयी सांगीतिक चर्चा करण्याऐवजी बाकीच्या गोष्टींना जास्त महत्त्व दिले. वाद-विवाद, लतादीदींनी लग्न का केले नाही? लतादीदी आणि आशा भोसले यांच्या काय मतभेद होते? लतादीदींच्या स्मारकाचा वाद वगैरे गॉसिप्सवर त्यांचा भर होता. पण लतादीदी नेमक्या घडल्या कशा?, त्यांच्या आयुष्यातले मौलिक क्षण कोणते होते(, याविषयी फारसे सांगितले गेले नाही. ते आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत.Fundamental moments in Lata’s life

ज्यांच्या गळ्यात गंधार आहे, असे मास्टर दीनानाथ म्हणायचे, त्या बालगंधर्वांबरोबर लतादीदींचा हा दुर्मिळ फोटो. यामध्ये अनेक दिग्गज बालगंधर्वांभोवती बसलेले दिसत आहेत. हे आहेत, संगीतकार वसंत देसाई, गझल सम्राज्ञी बेगम अख्तर आणि भेंडीबाजार घराण्याच्या अव्वल गायिका आणि प्रख्यात चित्रकार राजा रविवर्मा यांच्या अनेक चित्रांमधील मॉडेल अंजनीबाई मालपेकर!!

 

लतादीदींचा आवाज पातळ आहे, असे सांगून म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांना शशधर मुखर्जींनी एंट्री नाकारली… पण “हीच” हिंदी चित्रपट संगीताचे भविष्य बदलेल, असे शशधर मुखर्जींनाच आत्मविश्वासाने सांगणारे संगीतकार गुलाम हैदर!! त्यांच्यासमवेत लतादीदींचा हा दुर्मिळ फोटो!!

सगळ्यात क्लिष्ट संगीतरचना करणारे पण लतादीदींचे अत्यंत आवडते संगीतकार सज्जाद हुसेन यांच्यासमवेत लतादीदींचा हा दुर्मिळ फोटो. “लताजी ठीकसे गाईये यह नौशाद का म्युझिक नही है,” असे त्यांनी सुनावले होते. किशोर कुमार यांना “शोर कुमार” आणि तलत महमूद यांना “गलत मेहमूद” असेही संबोधायला त्यांनी कमी केले नव्हते. तलत मेहमूद यांच्याकडून त्यांनी 17 वेळा गाण्याची रिहर्सल करून घेतली होती.

1940 च्या दशकातील गायक नट श्यामसुंदर यांच्यासमवेत लतादीदी.

1940 – 50 च्या दशकातील एकमेकींच्या स्पर्धक आणि सहकारी देखील गायिका लता मंगेशकर, मीना कपूर आणि गीता दत्त.

“ए मेरे वतन के लोगो” हे गीत लतादीदींनी गायल्यानंतर पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या डोळ्यात पाणी आले, हा किस्सा खूप गाजला. त्याचा फोटोही गाजला. पण त्या गीताचे मूळ रेकॉर्डिंग करण्याचा हा दुर्मिळ फोटो. संगीतकार सी रामचंद्र यांच्यासमवेत लतादीदी!!

ज्या महान संगीतकाराने लतादीदींपेक्षा आशा भोसले यांना आपली पहिली पसंती दिली. लता मंगेशकर यांच्या शिवाय आपण प्रसिद्धी मिळवू शकतो, हे सिद्ध केले, ते संगीतकार म्हणजे ओ. पी. नय्यर!! त्यांचा आशा भोसले, उषा मंगेशकर आणि लतादीदी यांच्यासमवेत असलेला हा दुर्मिळ फोटो. ओ. पी. नय्यर यांनी वसंत देसाई यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे.

लतादीदी आपले वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांची पुण्यतिथी निमित्त संगीत श्रद्धांजली चा कार्यक्रम आयोजित करत असत. त्याचा 1960 च्या दशकातील हा दुर्मिळ फोटो. पंडित भीमसेन जोशी, शिव कुमार शर्मा, पंडित रविशंकर, वसंत देसाई अशा दिग्गज कलावंतांनी एकाच कार्यक्रमात हजेरी लावणे हा मणिकांचन योग लतादीदींनी साधला होता. यामध्ये सर्व मंगेशकर भावंडेही दिसत आहेत.

जुन्या जमान्यातील संगीतकार जयदेव यांच्या समवेत लतादीदी!!

हिंदी चित्रपट सृष्टीत माईलस्टोन ठरलेला सिनेमा पाकीजा!! पाकीजाचे संगीतकार गुलाम मोहम्मद यांच्यासमवेत लतादीदी!!

“कंबख्त कभी बेसुरी होतीही नही”, असे लतादीदींना प्रेमाने संबोधणाऱ्या बडे गुलाम अलींसमवेत लतादीदींचा हा दुर्मिळ फोटो.

 

फोटो सौजन्य : lataonline.com

Fundamental moments in Lata’s life