श्री नृसिंह कृपादासजी महाराज यांचा नाशिकच्या रामतीर्थ निरंजन मठात २७ जूनला पट्टाभिषेक सोहळा!!

Nrusinha Kripadasji Maharaj

विशेष प्रतिनिधी

नाशिक : श्री सद्गुरू कृपेनें रामतीर्थ निरंजन मठाचे मठाधिपती म्हणून विराजमान होणारे श्री नृसिंह कृपादासजी महाराज यांचा भव्य पट्टाभिषेक सोहळा(चादर विधी) शनिवार, दिनांक २७ जून २०२६ रोजी अभिजित मुहूर्तावर संपन्न होणार असल्याची माहिती स्वागत समितीने आज पत्रकार परिषदेत दिली. हा सोहळा महंत श्री भक्तीचरणदासजी महाराज, विरक्त साधू समाज नाशिक मंडळ, नाशिक यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध मठांचे साधू – महंत या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.Nrusinha Kripadasji Maharaj



या कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ११.०० ते १२.०० या वेळेत पट्टाभिषेक (चादर विधी) ने होईल. त्यानंतर १२.०० ते १.०० या वेळेत साधुसंत, महंतांचा सत्कार, सन्मान आणि महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा रामतीर्थ निरंजन मठ, ७८९, उमा महेश्वर लेन,एकमुखी दत्त मंदिराजवळ,रविवार पेठ, नाशिक येथे संपन्न होणार आहे.

या धार्मिक आणि ऐतिहासिक सोहळ्यास भाविक, श्रद्धाळू, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशीर्वाद घ्यावेत, तसेच सांयकाळी ६:३० वाजता ३१ गोदासेवकांन हस्ते गोदा महाआरती आणि प्रसादाचे आयोजन केले आहे. त्याचाही भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्वागत समितीचे अध्यक्ष श्री धनंजय बेळे, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष श्री जयंत गायधनी तसेच वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालय (गुरुकुल) वेद पाठशाळेचे अध्यक्ष श्री मदन देवी आणि स्मार्त चुडामणि श्री शांताराम शास्त्री भानोसे गुरुजी यांनी केले आहे.

The coronation ceremony of Shri Nrusinha Kripadasji Maharaj will take place at the Ramtirtha Niranjan Math in Nashik on June 27!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात