” मै अटल हू” या सिनेमाच्या माध्यमातून माझी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कहाणी रुपेरी पडद्यावर.


अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी व्हिडिओ शेअर करत व्यक्त केली आपली भावना.


विशेष प्रतिनिधी

पुणे : अटल बिहारी वाजपेयी भारतीय राजकारणातलं कायमच आदरपूर्वक घेतल्या जाणार नाव. भारतीय राजकारणाचे धडे देताना अनेकदा अटल बिहारी वाजपेयी यांच्या धोरणांचा त्यांच्या राजकीय विचारांचा अनेकदा दाखला दिला जातो. अटल बिहारी वाजपेयी यांच्यातला संवेदनशील कवी वेळोवेळी संसदेमध्ये आपल्याला दिसला. Pankaj Tripathi upcoming movie mai Atal Hu!!

आपल्या वक्तृत्वाच्या आणि नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी भारतीय जनता पार्टी हा पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवला . भारताचे माजी पंतप्रधान म्हणून त्यांनी संपूर्ण देशाची सांभाळलेली धुरा देखील कौतुकास्पद आहे . आजही तरुण पिढी देखील अटल बिहारी वाजपेयी यांची भाषण ऐकत ऐकत मोठी होतात .केवळ भारतीय जनता पार्टी या पक्षातच नाही . इतर पक्षात देखील अटल बिहारी वाजपेयी यांच्या बाबतीत त्यांच्या धोरणाबद्दल आदर आहे. यास मोठ्या नेत्याचा आयुष्य आता मोठ्या पडद्यावर साकार होणार आहे.यापूर्वी वेगवेगळ्या राजकीय व्यक्तिमत्वांवर चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या आयुष्यावरील द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट कमालीचा लोकप्रिय झाला होता. त्यानंतर मराठी मध्ये ओम राऊत यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील चित्रपटाची निर्मिती केली होती. आता कंगना भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर चित्रपटाची निर्मिती करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pankaj Tripathi (@pankajtripathi)

दुसरीकडे मराठीतील प्रतिभावंत दिग्दर्शक रवी जाधव हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकमध्ये व्यस्त आहे. यापूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल झाला होता. त्यानंतर समोर आलेल्या टीझरनं प्रेक्षकांना जिंकून घेतले होते. यामध्ये बॉलीवूडचा प्रसिद्घ अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर बीटीएसचा एक व्हिडिओही शेयर केला आहे.

या व्हिडिओमध्ये पंकज त्रिपाठी यांनी आपल्या नवीन सिनेमाची मैं अटल हू च्या फायनल शेड्युलच्या समाप्तीची घोषणा केली आहे. त्यात राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासोबत काम करतानाचा आनंद मोठा होता असेही अभिनेत्यानं म्हटलं आहे. पंकज यांनी त्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, अटलजी यांच्यासोबतचा प्रवास, ती यात्रा खूप काही देऊन जाणारी आहे.

खूप काही शिकवून जाणारी आहे. प्रेरणादायी प्रवास होता हा, अटलजी यांचे व्यक्तिमत्व कमालीचे प्रभावी होते. त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करण्याची संधी मिळते आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे. यावेळी दिग्दर्शक रवि जाधव यांनी देखील पंकज यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.

Pankaj Tripathi upcoming movie mai Atal Hu!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात