विशेष प्रतिनिधी
बारामती : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भात केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता होती; मात्र अद्याप तो घेतला गेलेला नाही. त्यामुळे आज दिल्लीत विरोधी पक्षांचे नेते एकत्र येत आहेत. आमच्या पक्षाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह काही नेते या आंदोलनात सहभागी होतील. मात्र सध्या माझे संपूर्ण लक्ष राज्यातील दुष्काळ, पाणी आणि चारा प्रश्नावर केंद्रित आहे, अशी भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडली. Sharad Pawar
माळेगाव (बारामती) येथे रविवारी (ता. १) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भात केंद्र सरकारने वेळीच निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र सरकारने याबाबत निर्णय घेतला नसल्याने विरोधी पक्षांना एकत्र येण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत विरोधी पक्षांचे नेते आंदोलनासाठी एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे आणि अन्य नेते या आंदोलनात सहभागी होतील, असे पवार यांनी सांगितले.
दरम्यान, ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या वतीने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत असून पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या राजकीय घडामोडींपेक्षा सध्या दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देणे हेच आपले प्राधान्य असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App