Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले- 100% इथेनॉलवर चालणारी वाहने आणणार; 22 लाख कोटींची इंधन आयात थांबवण्याचा उद्देश

Nitin Gadkari

विशेष प्रतिनिधी

पुणे : Nitin Gadkari  देशातील वाढती इंधन आयात, प्रदूषण आणि पर्यायी ऊर्जेचा वाढता वापर व जवळपास २२ लाख कोटी रुपयांच्या इंधनाची आयात थांबविण्यासाठी १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने लाँच करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महा मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यामुळे शेतकरी, साखर उद्योग आणि वाहन क्षेत्रात मोठे बदल होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र, ही वाहने नेमकी कधी बाजारपेठेत येतील, याची माहिती त्यांनी दिली नाही.Nitin Gadkari

दरम्यान, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर, श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट यासारखी महत्त्वाची देवस्थाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यासाठी रस्ते जाळे मजबुतीचे महत्त्व मोठे आहे. या बाबी लक्षात घेऊन बांधण्यात आलेले या महामार्गांमुळे अध्यात्मिक स्थळांपर्यंत पोहोचणे भाविकांसाठी सुलभ झाले आहे. डिसेंबरपर्यंत पालखी महामार्ग पूर्ण होईल. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पालखी घेऊन येणाऱ्या वारकरी-भाविकांसाठी वेगळा रस्ता केला आहे. त्यामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर झाल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.Nitin Gadkari



ग्रामीण अर्थव्यवस्थेला ३ लाख कोटींचा बुस्टर डोस मिळू शकतो

तज्ज्ञांच्या मते इथेनॉल ६० ते ६५ रुपये प्रति लिटर दराने मिळू शकेल. इंधन खर्चात थेट ३० ते ४० टक्के बचत होईल. अतिरिक्त ऊस, खराब झालेला मका किंवा तांदूळापासून इथेनॉल बनत असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला ३ लाख कोटींचा बुस्टर डोस मिळेल. ब्राझीलमध्ये ८०% वाहने फ्लेक्स-फ्युएल तंत्रज्ञानावर चालतात. भारतात टोयोटा, बजाज व टीव्हीएसचे यावर काम सुरू केले आहे.

Nitin Gadkari Announces 100% Ethanol-Powered Vehicles to Curb Fuel Imports

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात