केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितीन गडकरी यांनी पटोलेंच्या अटकेची मागणी केली आहे. Nana Patole’s sensational statement, increased security outside the house in Nagpur
विशेष प्रतिनिधी
नागपूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.यावेळी नाना पटोले म्हणाले होते की, मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो.दरम्यान याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
नाना पटोले यांच्या वक्तव्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे, पोलिसांनी पटोले यांच्या नागपूर निवासस्थानाबाहेरी सुरक्षा वाढवली आहे. देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करुन पटोलेंसह काँग्रेसला लक्ष्य केलंय.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितीन गडकरी यांनी पटोलेंच्या अटकेची मागणी केली आहे.तसेच आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यांनी पटोलेविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App