या गावित बहिणींची फाशी रद्द करण्याची याचिका हायकोर्टानं स्वीकारली असून दिलेल्या शिक्षेची अमलबजावणी करण्यात प्रशासनाने विलंब केल्याचंही मुंबई हायकोर्टानं सांगितलं. Mumbai High Court quashes death sentence of Gavit sisters who killed nine children in 1990s
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागांत १९९० च्या दशकात मुलं गायब होत होती. या प्रकरणांत गावित बहिणींचा हात असल्याचं समोर आलं दरम्यान त्यानंतर काही धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या.या गावित बहिणींनी ९ बालकांची हत्या केली होती.अंजना गावित , रेणुका गावित आणि सीमा गावित या तीन बहिणींचा यामध्ये समावेश आहे. या गावित बहिणींना मुंबई हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या गावित बहिणींची फाशी रद्द करण्याची याचिका हायकोर्टानं स्वीकारली असून दिलेल्या शिक्षेची अमलबजावणी करण्यात प्रशासनाने विलंब केल्याचंही मुंबई हायकोर्टानं सांगितलं. कोर्टाने, आरोपींचा गुन्हा माफी देण्यासारखा नाही, मात्र प्रशासनाच्या उदासिनतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं सांगतिलं.
महाराष्ट्रात 90च्या दशकाच्या हत्याकांडातील आरोपी सीमा गावित आणि रेणुका शिंदे ( गावित ) या कोल्हापूरमधील दोन बहिणींनी आपली आई अंजनाबाई गावितच्या मदतीनं विविध भागातून 13 बालकांचं अपहरण केलं होत.दरम्यान या 13 बालकांपैकी 9 बालकांची हत्या या दोन गावित बहिणींनी केली होती.दरम्यान या क्रूर कृत्यासाठी या दोन गावित बहिणींना 2001 साली फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
पुढे सर्वोच्च न्यायालयानंही 2006 मध्ये त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. दरम्यान आरोपी अंजना गावित आणि तिच्या दोन मुली म्हणजेच सीमा गावित आणि रेणुका शिंदे ( गावित ) यांनी भीक मागण्यासाठी या 13 मुलांचं अपहरण केलं. त्यापैकी ज्या मुलांनी पैसे कमावणं बंद केलं म्हणून त्या मुलांची दगडावर आपटून निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
दरम्यान पुढे पैशांवरून वाद निर्माण झाल्यानं रेणुका शिंदे हिचा नवरा त्यांच्यातून बाहेर पडला.पुढे त्याने जवळच्या पोलिसांत जाऊन याबाबतची संपूर्ण माहिती दिली.दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी त्याला माफिचा साक्षीदार बनवलं होतं.दरम्यान या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यानच अंजनाबाईचा मृत्यू झाला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App