भांडुपमध्ये नेमकं काय घडलं? मंत्री अदिती तटकरे यांच्या पीआरओचा अचानक मृत्यू

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आशिष मेटे (वय ३५) यांचा भांडुपमध्ये अचानक मृत्यू झाला. जेवणानंतर घराबाहेर परिसरात फेरफटका मारत असताना चक्कर येऊन खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना ३० ऑगस्ट रोजी रात्री भांडुप पश्चिम परिसरात घडली. आशिष मेटे हे मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी होते.Aditi Tatkare’s PRO Ashish Mete

भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष मेटे हे त्यांच्या व्यावसायिक सहकारी दिपाली प्रभू यांच्या भांडुप पश्चिम येथील एलबीएस रोडवरील मयुरेश रेसिडेन्सी येथील घरी जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर त्यांना अॅसिडिटीचा त्रास जाणवू लागल्याने ते इमारतीच्या परिसरात फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते. फेरफटका मारत असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. खाली कोसळल्यामुळे मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने भांडुप पश्चिम येथील नवकार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


 


मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. राजावाडी रुग्णालय प्रशासनाकडून घटनेची माहिती भांडुप पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अंतर्गत अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
आशिष मेटे हे मंत्री अदिती तटकरे यांच्या सोशल मीडिया आणि जनसंपर्काशी संबंधित कामकाजात कार्यरत होते. तसेच ते दिपाली प्रभू यांच्यासोबत सोशल मीडिया आणि जनसंपर्क क्षेत्रातील विविध प्रकल्पांवर काम करत होते. त्यांचे कार्यालय मुंबईतील मरीन ड्राइव्हजवळील मिट्टल कोर्ट परिसरात असल्याची माहिती आहे. कामानिमित्त ते मुंबईत येत असत, तर त्यांचे कुटुंब मूळ गावी राहत असल्याचे सांगण्यात आले आहे. आशिष मेटे यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आणि पुढील तपासानंतरच मृत्यूचे निश्चित कारण समोर येणार असल्याचे भांडुप पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Minister Aditi Tatkare’s PRO Ashish Mete Dies Suddenly in Bhandup

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात