विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला असून या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आझाद मैदानाची पाहणी करून संभाव्य आंदोलनाची पूर्वतयारी सुरू केली आहे येत्या २९ ऑगस्टपासून जरांगे पाटील यांचे पुन्हा उपोषण सुरू होत आहे. २९ ऑगस्टपासून उपोषणाला सुरुवात होणार आहे. उपोषण आंतरवाली सराटीत होणार की मुंबईत, याबाबत मनोज जरांगे पाटील अंतिम निर्णय घेणार आहेत.
मागील आंदोलनात पावसामुळे झालेला चिखल, व्यासपीठाची जागा आणि माध्यमांच्या प्रतिनिधींना पडलेली जागेची कमतरता या त्रुटींवर मात करण्यासाठी यंदा विशेष नियोजन केले जात आहे. तसेच येण्या-जाण्याचा मार्ग कसा असेल याची चाचपणी करण्यात आली.
गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषण मुंबईत करणार की अंतरवाली सराटीत करणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मनोज जरांगे पाटील यांनीच उपोषण अंतरवाली सराटीत करणार असल्याची माहिती दिली हाेती. मात्र, आझाद मैदानाची पाहणी केल्याने आता पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. उपोषण सुरु असतानाच मुंबईला जाणार आहे. त्यासाठी परवानगी अर्ज केला असल्याचं जरांगे पाटील यांनी यापूर्वीच स्पष्ट केले हाेते.
दरम्यान, जरांगे यांची समजूत काढण्यासाठी माजी मंत्री व शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी सरकारच्या वतीने त्यांची भेट घेतली हाेती. तासभर चाललेल्या या बैठकीत मार्ग निघू शकला नाही. त्यामुळे जरांगे उपाेषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App